Home / देश-विदेश / Pannun Case Update: पन्नू हत्येच्या कटाची निखिल गुप्ताने दिली कबुली! अमेरिकन न्यायालयात तीन गुन्हे स्विकारल्याने खळबळ

Pannun Case Update: पन्नू हत्येच्या कटाची निखिल गुप्ताने दिली कबुली! अमेरिकन न्यायालयात तीन गुन्हे स्विकारल्याने खळबळ

Pannun Case Update: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या निखिल गुप्ताने अमेरिकेमधील मॅनहॅटन येथील फेडरल...

By: Team Navakal
Pannun Case Update
Social + WhatsApp CTA

Pannun Case Update: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या निखिल गुप्ताने अमेरिकेमधील मॅनहॅटन येथील फेडरल कोर्टात आपले गुन्हे मान्य केले आहेत. ५४ वर्षीय गुप्ताने हत्येसाठी सुपारी देणे, हत्येचा कट रचणे आणि मनी लाँड्रिंगचा कट रचणे अशा ३ मुख्य गुन्ह्यांची कबुली दिली. या गुन्ह्यांसाठी त्याला एकत्रितपणे जास्तीत जास्त 40 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

नेमके प्रकरण काय आहे?

अमेरिकन यंत्रणांनी लावलेल्या आरोपानुसार, निखिल गुप्ताने न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या पन्नूची हत्या करण्यासाठी एका मारेकऱ्याला १,००,००० डॉलर्सची सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता. हा कट अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला, कारण ज्या व्यक्तीला सुपारी देण्यात आली होती, तो प्रत्यक्षात अमेरिकन फेडरल एजंट होता. जून 2024 मध्ये चेक प्रजासत्ताकमधून प्रत्यार्पण केल्यापासून गुप्ता ब्रुकलिनमधील तुरुंगात आहे.

भारतीय अधिकाऱ्याचा उल्लेख

अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणात विकास यादव नावाच्या एका माजी भारतीय सरकारी अधिकाऱ्याचा उल्लेख केला आहे. यादव यांनीच पन्नूच्या हत्येसाठी गुप्ताची मदत घेतली होती, असा दावा अमेरिकेने केला आहे. मात्र, भारत सरकारने या कटाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे वारंवार स्पष्ट केले असून, अशा कारवाया सरकारी धोरणाच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारताने नोव्हेंबर 2023 मध्ये एक उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली होती.

कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?

पन्नू हा ‘शीख फॉर जस्टिस’ या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख आहे. भारताने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. अमृतसरजवळील खानकोट गावात जन्मलेला पन्नू वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून भारताला आणि भारतीयांना धमकावण्याचे काम करत असतो. एकदा त्याने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती.

जानेवारी 2025 मध्ये भारताच्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला होता, ज्यात संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची शिफारस करण्यात आली होती. आता निखिल गुप्ताने स्वतःहून गुन्ह्यांची कबुली दिल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या