Home / देश-विदेश / Nimesulide Ban India : सावधान! तुमच्या घरातील ‘हे’ पेनकिलर ठरू शकते जीवघेणे; केंद्र सरकारकडून बंदी

Nimesulide Ban India : सावधान! तुमच्या घरातील ‘हे’ पेनकिलर ठरू शकते जीवघेणे; केंद्र सरकारकडून बंदी

Nimesulide Ban India : भारतात ताप आणि अंगदुखीसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘निमेसुलाईड’ या औषधाबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय...

By: Team Navakal
Nimesulide Ban India
Social + WhatsApp CTA

Nimesulide Ban India : भारतात ताप आणि अंगदुखीसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘निमेसुलाईड’ या औषधाबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मानवी आरोग्याला असणारा धोका लक्षात घेऊन सरकारने 100 mg पेक्षा जास्त डोस असलेल्या निमेसुलाईडच्या वापरावर अधिकृतपणे बंदी घातली आहे.

उच्च डोसमुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आल्यानंतर औषध नियामकांनी हे पाऊल उचलले आहे.

यकृत निकामी होण्याचा मोठा धोका

आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) आणि तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, या औषधाच्या अतिवापरामुळे किंवा उच्च डोसमुळे यकृत गंभीररित्या खराब होऊ शकते, जे काही प्रकरणांमध्ये जीवघेणे ठरू शकते.

यापूर्वी याच वर्षाच्या सुरुवातीला जनावरांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाईडवरही बंदी घालण्यात आली होती, कारण यामुळे गिधाडांच्या संख्येवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले होते.

जगातील अनेक देशांत आधीच बंदी

निमेसुलाईड हे औषध 1985 मध्ये पहिल्यांदा इटलीमध्ये सादर करण्यात आले होते. मात्र, त्याच्या दुष्परिणामांमुळे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांसारख्या विकसित देशांनी या औषधाला कधीच परवानगी दिली नाही. फिनलंड, स्पेन आणि सिंगापूर सारख्या देशांनी 2002 ते 2007 या काळात हे औषध बाजारातून मागे घेतले होते.

जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित संस्थांनीही या औषधावर जागतिक बंदी घालण्याची मागणी केली होती, कारण इतर उपलब्ध औषधांच्या तुलनेत याचे दुष्परिणाम अधिक गंभीर आहेत.

भारतातील निर्बंध आणि दुष्परिणाम

भारतात 2011 मध्ये 12 वर्षांखालील मुलांसाठी या औषधावर बंदी घालण्यात आली होती, परंतु मोठ्या माणसांसाठी त्याचा वापर सुरूच होता. डॉक्टरांच्या मते, निमेसुलाईडमुळे पोटदुखी, मळमळ, उलट्या, चक्कर येणे आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ वापर केल्यास अंतर्गत रक्तस्त्राव, किडनी खराब होणे आणि त्वचेवर गंभीर रॅशेस येण्याचा धोका असतो. भारतीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) आता या औषधाच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा – BMC Election 2026 : मुंबई कुणाची? वाचा बीएमसी निवडणुकीचा 50 वर्षांचा रंजक इतिहास

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या