NIRF Rankings 2025: शिक्षण मंत्रालयाने NIRF (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) रँकिंग 2025 जाहीर केले. शिक्षण, संशोधन आणि इतर महत्त्वपूर्ण मानदंडांवर आधारित ही रँकिंग विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य शिक्षण संस्था (Education Ranking) निवडण्यास मदत करते.
यंदाच्या रँकिंगमध्ये काही संस्थांनी आपली जागा कायम राखली आहे, तर काहींनी लक्षणीय प्रगती केली आहे.
या संस्था ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट (NIRF Rankings 2025)
NIRF रँकिंग 2025: सर्व विभागांमधील सर्वोत्कृष्ट संस्थाची यादी
- संपूर्ण देशातील सर्वोच्च संस्था: IIT मद्रास
- भारतातील सर्वोकृष्ट विद्यापीठ: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू
- भारतातील सर्वोकृष्ट कॉलेज: हिंदू कॉलेज, दिल्ली
- भारतातील सर्वोकृष्ट अभियांत्रिकी संस्था: IIT मद्रास
- भारतातील सर्वोकृष्ट व्यवस्थापन संस्था: IIM अहमदाबाद
- भारतातील फार्मसी संस्था: जामिया हमदर्द, नवी दिल्ली
- भारतातील सर्वोकृष्ट कृषी आणि संबंधित क्षेत्रे संस्था: भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), नवी दिल्ली
- भारतातील सर्वोकृष्ट संशोधन संस्था: IISc बेंगळुरू
- भारतातील सर्वोकृष्ट मुक्त विद्यापीठ: IGNOU
- भारतातील सर्वोकृष्ट कौशल्य विद्यापीठ: सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ, पुणे
- भारतातील सर्वोकृष्ट राज्य सार्वजनिक विद्यापीठ: जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता
- भारतातील सर्वोकृष्ट SDG संस्था: IIT मद्रास
- भारतातील सर्वोकृष्ट कायदा संस्था: नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU), बेंगळुरू
- भारतातील सर्वोकृष्ट वैद्यकीय संस्था: AIIMS दिल्ली
- भारतातील सर्वोकृष्ट वास्तुकला आणि नियोजन संस्था: IIT रुरकी
- भारतातील सर्वोकृष्ट दंतवैद्यक संस्था: AIIMS दिल्ली
- भारतातील सर्वोकृष्ट नवोपक्रम संस्था: IIT बॉम्बे
भारतातील टॉप 10 कॉलेजेस (Top Colleges India)
या वर्षी, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये भारतातील काही सर्वोत्तम कॉलेजेस आहेत. NIRF ने रँकिंगसाठी संसाधन उपलब्धता, विद्यार्थी संख्या, रिसर्च पेपरची गुणवत्ता आणि प्लेसमेंट यांसारख्या विविध निकषांचा विचार केला आहे.
- Hindu College, दिल्ली – 84.01
- Miranda House, दिल्ली – 83.20
- Hans Raj College, दिल्ली – 81.75
- Kirori Mal College, दिल्ली – 80.33
- St. Stephens’s College, दिल्ली – 79.41
- Rama Krishna Mission Vivekananda Centenary College, पश्चिम बंगाल – 76.74
- Atma Ram Sanatan Dharm College, दिल्ली – 76.09
- St. Xavier`s College, पश्चिम बंगाल – 76.07
- PSGR Krishnammal College for Women, तमिळनाडू – 75.52
- PSG College of Arts and Science, तमिळनाडू – 73.15
यंदाच्या रँकिंगमध्ये, Kirori Mal College ने सर्वात मोठी झेप घेतली आहे. 2024 मध्ये नवव्या क्रमांकावर असलेले हे कॉलेज थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे.
दुसरीकडे, Hindu College आणि Miranda House यांनी सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या दोन क्रमांकावर आपले स्थान कायम राखले आहे, त्यांच्या कामगिरीत 10% पेक्षा जास्त सुधारणा झाली आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
थेट अजित पवारांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा कोण आहेत?
मंडल वरून शिवसेना सोडली आता मंत्रिपद सोडणार का? राऊतांचा भुजबळांना सवाल
किम-पुतिन भेटीनंतर जोंग यांच्या ग्लाससह खुर्ची व ठशांची सफाई