Home / देश-विदेश / ‘पैसे घेऊन माझ्याविरोधात…’; नितीन गडकरी यांचा मोठा आरोप

‘पैसे घेऊन माझ्याविरोधात…’; नितीन गडकरी यांचा मोठा आरोप

Nitin Gadkari on E20 Fuel: गेल्याकाही दिवसांपासून ई20 इंधनावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका होत आहे. आता यावर गडकरी...

By: Team Navakal
Nitin Gadkari on E20 Fuel

Nitin Gadkari on E20 Fuel: गेल्याकाही दिवसांपासून ई20 इंधनावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका होत आहे. आता यावर गडकरी यांनी भाष्य केले आहे.

‘E20’ इंधनाच्या वापरावरून सुरू असलेल्या सोशल मीडिया मोहिमेवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा आरोप केला आहे. ही मोहीम “पैसे देऊन चालवली जात असून, मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

‘E20’ मुळे शेतकऱ्यांना झाला45,000 रुपये कोटींचा फायदा

इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणावर प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले की, “तुमचा उद्योग जसा काम करतो, तसेच राजकारणही काम करते. ही सोशल मीडिया मोहीम पैसे देऊन चालवली जात आहे. त्याचा उद्देश मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करणे आहे. यात कोणतेही तथ्य नाही.” ते म्हणाले की, ‘E20’ इंधन आयात कमी करणारे, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे.

गडकरी यांनी सांगितले की, भारत जीवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणात खर्च करतो. तो खर्च वाचवून तो पैसा भारतीय अर्थव्यवस्थेत वापरणे योग्य नाही का, असा सवाल त्यांनी केला. तसेच, मक्यापासून इथेनॉल बनवल्यामुळे शेतकऱ्यांनी 45,000 कोटी रुपये कमावले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मायलेज कमी होण्याबद्दल सरकारचे स्पष्टीकरण

दरम्यान, सरकारनुसार, मायलेज कमी होत असल्याचा दावा ‘कीचा आहे. गाडीचे मायलेज हे इंधनासोबतच ड्रायव्हिंगची सवय, टायरमधील हवा, इंजिनची देखभाल आणि एअर कंडिशनिंगचा वापर यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

दुसरीकडे E20 इंधनामुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असल्याचा दावा काही वाहन मालकांकडून केला जात आहे, तसेच यामुळे वाहनांची झीज वाढून आयुष्य कमी होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, सरकारने या दाव्यांना चुकीचे ठरवले आहे. E20 इंधनामुळे गाडीचे ॲक्सलरेशन आणि राइड क्वालिटी चांगली होते, तसेच कार्बन उत्सर्जनही कमी होते, असा सरकारचा दावा आहे.


हे देखील वाचा – ‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या