Home / देश-विदेश / ‘दोन वर्षांत भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होणार’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विश्वास

‘दोन वर्षांत भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होणार’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विश्वास

Nitin Gadkari on Indian Road | पुढील 2 वर्षांमध्ये भारतातील रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यांसारखे होतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक...

By: Team Navakal
Nitin Gadkari on Indian Road |

Nitin Gadkari on Indian Road | पुढील 2 वर्षांमध्ये भारतातील रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यांसारखे होतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दशकात केंद्र सरकारने रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.

एका मुलाखतीत बोलताना गडकरी म्हणाले, “भारताची रस्ते पायाभूत सुविधा मोठ्या झपाट्याने विकसित होत असून, पुढील दोन वर्षांत अमेरिकेच्या (America) पातळीवर पोहोचेल. अनेक मोठे प्रकल्प वेगाने उभारले जात असून, त्यांचा परिणाम लवकरच दिसून येईल.”

गडकरींनी नमूद केले की, भारतातील रस्ते व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सुधारणा निर्यातीस चालना देत आहेत. “लॉजिस्टिक्स खर्च कमी झाल्याने भारताची निर्यात स्पर्धात्मक झाली आहे. चीनमध्ये लॉजिस्टिक्स खर्च 8% आहे, अमेरिका व युरोपमध्ये 12% आहे, तर भारतात तो पूर्वी 16% होता. आता तो 9% पर्यंत खाली आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. सध्या 25 ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे, 3,000 किमी पोर्ट कनेक्टिव्हिटी हायवेआणि 1 लाख कोटींचे धार्मिक पर्यटन मार्ग उभारण्यात येत आहेत. बौद्ध सर्किट व चार धाम या धार्मिक स्थळांना सर्व हवामानात चालणाऱ्या रस्त्यांद्वारे जोडण्यावर भर दिला जात आहे.

गडकरींनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर मार्गावर 36 बोगद्यांपैकी 23 पूर्ण झाले आहेत. “पर्वतमाला योजनेअंतर्गत 15 रोपवे तसेच 35 मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क उभारले जात आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधा ही कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाची किल्ली असते. भारताने या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली असून, 2021 मध्ये सुरू झालेल्या PM गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनमुळे विविध मंत्रालयांतील समन्वय वाढला आहे.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रस्ते नेटवर्कअसलेला देश असून, राष्ट्रीय महामार्गांची लांबी 2024 मध्ये 1,46,145 किमीपर्यंत वाढली आहे. यातून देशात दैनंदिन 33.8 किमी रस्त्यांची बांधणी होत असल्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. 2014 पासून आतापर्यंत चार किंवा अधिक लेन असलेल्या रस्त्यांची लांबी 2.6 पट, तर उच्च-गती कॉरिडॉर 23 पट वाढले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या