Nitish Kumar : अखेर बिहारमधला सस्पेन्स संपला. उद्या गांधी मैदानावर नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या समारंभाला उपस्थिती लावणार आहेत. त्यापूर्वी, आज NDA ची महत्वाची बैठक पार पडली आहे, ज्यात नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले आहे. म्हणजेच, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, यावर आज अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
एनडीए आमदारांची बिहार विधानसभेच्या इमारतीत आज बैठक झाली. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर देखील करण्यात आला.
आता नितीश कुमार राजभवनात जाऊन राजीनामा देतील आणि सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. तर, उद्या सकाळी भव्य शपथविधी सोहळ्यात दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिंहा हे उप-मुख्यमंत्रिपदाची शपत घेणार आहेत. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाची व्यापक तयारी देखील सुरू आहे. एनडीएचे अनेक वरिष्ठ नेते देखील या समारंभात सहभागी होणार आहेत.
हे देखील वाचा –









