Home / देश-विदेश / NEET-UG 2025 Result| नीट-युजी परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात पहिला

NEET-UG 2025 Result| नीट-युजी परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात पहिला

नवी दिल्ली –राष्ट्रीय चाचणी संस्थाने (NTA) आज नीट-यूजी २०२५ (NEET UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या हनुमानगड...

By: Team Navakal
neet topper mahesh kumar

नवी दिल्ली –राष्ट्रीय चाचणी संस्थाने (NTA) आज नीट-यूजी २०२५ (NEET UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या हनुमानगड येथील महेश कुमार याने देशात पहिला क्रमांक पटकावला. त्याला ७२० पैकी ६८६ गुण मिळाले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूर येथील उत्कर्ष अवधिया याने दुसरा, तर महाराष्ट्राच्या कृषांग जोशी याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. यंदा पहिल्या १० यशस्वी उमेदवारांमध्ये केवळ एकच मुलगी आहे. दिल्लीच्या अविका अग्रवाल हिने मुलींच्या गटात अव्वल क्रमांक मिळवला आहे.

नीट-यूजी २०२५ परीक्षा ४ मे रोजी देशभरात घेण्यात आली होती. यामध्ये तब्बल २०.०८ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी ११.२३ लाख विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवली आहे. यावर्षीचा पेपर तुलनेने अधिक कठीण असल्याने सर्व श्रेणींसाठी पात्रता कट-ऑफमध्ये घट झाली आहे.

इंदूरच्या काही केंद्रांवर परीक्षा दरम्यान वीजपुरवठा खंडित होऊन वादळामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ७५ विद्यार्थ्यांनी आपल्याला पेपर नीट न सोडवता आल्याची तक्रार करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ९ जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या ७५ विद्यार्थ्यांचा निकाल तात्पुरता राखीव ठेवत, उर्वरित सर्वांचे निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली. या विद्यार्थ्यांचा निकाल नंतर जाहीर केला जाणार असून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीची घोषणा करण्यात येईल.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या