Home / देश-विदेश / Ola engineer commits suicide: ओला अभियंत्याची आत्महत्या ! वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Ola engineer commits suicide: ओला अभियंत्याची आत्महत्या ! वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Ola engineer commits suicide बंगळुरुमध्ये ओला इलेक्ट्रिक कंपनीतील अभियंता २८ सप्टेंबर रोजी आत्महत्या )Ola engineer commits suicide )केली. आत्महत्या करण्यापूर्वी...

By: Team Navakal
Ola engineer office
Ola engineer commits suicide बंगळुरुमध्ये ओला इलेक्ट्रिक कंपनीतील अभियंता २८ सप्टेंबर रोजी आत्महत्या )Ola engineer commits suicide )केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने  वरिष्ठांकडून छळ होत असल्याचा आरोप एका चिठ्ठीद्वारे केला होता. त्या आधाऱे पोलिसांनी कंपनीचे संस्थापक भाविश अगरवाल आणि वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास  यांच्यासह कंपनीतील अन्य कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

के. अरविंद असे या अभियंत्याचे नाव आहे. तो २०२२ पासून ओला इलेक्ट्रिक कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या भावाला त्यांच्या मृतदेहाशेजारी एक २८ पानी पत्र सापडले. या पत्रामध्ये त्यांनी सुब्रत कुमार दास आणि अगरवाल आपला मानसिक छळ करतात.या ना त्या कारणाने दबाव आणण्याचा प्रयत्न करतात.पगार तसेच अन्य भत्ते देण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता. 

के. अरविंद यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुब्रत दास आणि अगरवाल यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आणि त्यांना अटक केली. याबाबत ओला कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, के. अरविंद गेल्या साडेतीन वर्षांपासून कंपनीत कार्यरत होते. मात्र या संपूर्ण कालावधीत त्यांनी नोकरीबाबत तसेच मानसिक छळ होत असल्याची कोणतीही तक्रार केली नव्हती.अरविंद यांच्या कामाबाबत कंपनीचे संस्थापक भाविश अगरवाल यांच्यासह व्यवस्थापनाशी कोणताही थेट संवाद नव्हता. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला आम्ही कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.


हे देखील वाचा

ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाला गती सर्व परवानग्या मंजूर !अडथळे दूर

कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे देहू येथे लाक्षणिक उपोषण

उबाठाचा २५ ऑक्टोबरला मतदार यादीबाबत मेळावा

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या