Home / देश-विदेश / Bangladesh PM Oath Ceremony: बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचा शपथविधी; भारताकडून कोण उपस्थित राहणार? जाणून घ्या

Bangladesh PM Oath Ceremony: बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचा शपथविधी; भारताकडून कोण उपस्थित राहणार? जाणून घ्या

Bangladesh PM Oath Ceremony: शेजारील देश बांगलादेशमध्ये राजकीय परिवर्तनानंतर आता नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होत आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे...

By: Team Navakal
Bangladesh PM Oath Ceremony
Social + WhatsApp CTA

Bangladesh PM Oath Ceremony: शेजारील देश बांगलादेशमध्ये राजकीय परिवर्तनानंतर आता नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होत आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) अध्यक्ष तारिक रहमान १७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ढाका येथे जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी का उपस्थित राहणार नाहीत?

बांगलादेशने या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. मात्र, १७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यामुळे मोदींच्या ऐवजी ओम बिर्ला भारताचे प्रतिनिधित्व करतील. ओम बिर्ला यांची उपस्थिती ही भारत आणि बांगलादेशमधील मजबूत लोकशाही संबंध आणि शेजारील देशाचे महत्त्व अधोरेखित करणारी असल्याचे सरकारने म्हटले आहे.

निवडणुकीत बीएनपीचा दणदणीत विजय

२०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय निवडणुकीत बीएनपीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. संसदेच्या 297 जागांपैकी तब्बल 209 जागा जिंकून बीएनपीने दोन दशकांनंतर सत्ता मिळवली आहे. उजव्या विचारसरणीच्या जमात-ए-इस्लामीला 68 जागा मिळाल्या आहेत, तर शेख हसीना यांच्या आवामी लीगला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले होते. या निवडणुकीत 59.44 टक्के मतदानाची नोंद झाली.

कोण आहेत तारिक रहमान?

तारिक रहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. गेल्या 17 वर्षांपासून ते लंडनमध्ये विजनवासात होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा बांगलादेशच्या राजकारणात मुख्य केंद्रस्थानी आले आणि त्यांनी आपल्या पक्षाला मोठे यश मिळवून दिले.

भारत-बांगलादेश संबंधांचे नवीन वळण

निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांच्याशी फोनवरून संवाद साधून शुभेच्छा दिल्या आहेत. “बांगलादेशच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा राहील,” असे आश्वासन मोदींनी दिले आहे. दुसरीकडे, तारिक रहमान यांनी स्पष्ट केले आहे की, बांगलादेशचे हित डोळ्यासमोर ठेवूनच भारतासोबतचे संबंध ठरवले जातील. भारतासह चीन आणि पाकिस्तान यांसारख्या प्रादेशिक सत्तांसोबत संतुलित संबंध ठेवण्याचे धोरण त्यांनी जाहीर केले आहे.

या सोहळ्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासह भारत, चीन, सौदी अरेबिया आणि श्रीलंका अशा 13 देशांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या