‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो कुणी तयार केला होता? जाणून त्या अधिकाऱ्यांची नावे

Operation Sindoor

Operation Sindoor | पहलगाममधील (Pahalgam terror attack) भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने कठोर कारवाई करत 7 मेच्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते.

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत राबवलेल्या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव दिले होते. या नावाची व लोगोची त्यावेळी विशेष चर्चा झाली. आता ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो कोणी तयार केला याबाबतची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांनी हा लोगो तयार केला होता.

ऑपरेशन सिंदूर काय आहे?

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकस्थित दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले होते. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, या तळांवरून भारतात हल्ल्यांची योजना आखली जात होती आणि ते दहशतवादाचे केंद्र होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने या दहशतवादी पायाभूत सुविधांवर निशाणा साधला.

या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) म्होरक्या मसूद अझर (Masood Azhar) याच्या 10 नातेवाईकांसह सुमारे 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे माहिती समोर आली होती. हल्ल्याचे लक्ष्य बहावलपूर, मुजफ्फराबाद, कोटली, सियालकोट आणि मुरिदके या ठिकाणांवर असलेल्या जैश, लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba), हिजबुल मुजाहिद्दीन (Hizbul Mujahideen) च्या ठिकाणांवर होते.

कोणी तयार केला होता ऑपरेशन सिंदूरचा लोगो?

ऑपरेशन सिंदूरचा लोगो भारतीय लष्कराच्या (Indian Army HQ) ऑपरेशन्स रूममधून तयार करण्यात आला. याचे डिझाईन लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह यांनी केले. “SINDOOR” या शब्दातील ‘O’ सिंदूराच्या वाटीसारखा आहे, त्यातून सांडलेला लाल रंग हल्ल्यातील बळी गेलेल्या जीवांचे आणि त्यांच्या पत्नींच्या दुःखाचे प्रतीक आहे.

या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यामागे खास भावना आहे. हल्ल्यात विधवा झालेल्या महिलांच्या दुःखाला आवाज देण्यासाठी हे नाव देण्यात आले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पुरुषांना मारले होते.

हल्ल्यात पती गमावलेल्या महिला जसे की हिमांशी नारवाल, ऐशान्या द्विवेदी, शीतल कलाथिया आणि प्रगती जगदाळे यांचं दु:ख या नावामधून समोर आणण्यात आलं. हिमांशी नारवाल ज्यांचा पती नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नारवाल यांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू झाला, त्या पतीच्या मृतदेहाजवळ बसलेला फोटो संपूर्ण देशात व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकस्थित दहशतवादी तळं उद्धवस्त केली होती.