पद्मश्री महंत कार्तिक महाराजावर बलात्कार व गर्भपाताचा आरोप

Padma Shri Mahant Kartik Maharaj

मुर्शिदाबाद – पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri)सन्मानित आणि चर्चेत असलेले भारत सेवाश्रम संघाचे महंत कार्तिक महाराजवर पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका महिलेने बलात्कार, गर्भपात (abortion)आणि धमकावल्याचे आरोप केले आहेत. आश्रमातील शाळेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. पण कार्तिक महाराजने हे आरोप फेटाळून (denied) लावले आहेत.

या महिलेने तक्रारीत म्हटले की, महंत कार्तिक महाराज (Mahant Kartik Maharaj) यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद (Murshidabad) येथील आश्रमातील शाळेत नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर आश्रमात राहण्याची सोय करून एका रात्री खोलीत येऊन बळजबरीने बलात्कार (rape)केला. २०१३ च्या जानेवारी ते जून या काळात किमान १२ वेळा बलात्कार करण्यात आला. तक्रार केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली. दहशतीच्या सावटाखाली असल्यामुळे मी यावर काही बोलू शकली नाही.

या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, महंत कार्तिक महाराजने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी एक संन्यासी आहे. महंताच्या आयुष्यात असे अनेक अडथळे येतात. आमचे वकील न्यायालयात याचे उत्तर देतील असे त्यांनी म्हटले.