Khawaja Asif on India: पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आसिफ यांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या राजवट वगळता भारत कधीही खऱ्या अर्थाने एकसंघ नव्हता, असे विधान केले आहे. त्याचबरोबर, त्यांनी भारतासोबत युद्धाची शक्यता खरी असल्याचेही म्हटले आहे.
मुलाखतीत आसिफ म्हणाले, “इतिहास दाखवतो की औरंगजेबाच्या काळ वगळता भारत कधीही एकसंध राष्ट्र नव्हता. पाकिस्तानची निर्मिती अल्लाहच्या नावाने झाली. घरात आम्ही वाद घालतो, पण भारतासोबतच्या लढाईत आम्ही एकत्र येतो.”
युद्धाच्या शक्यतांवर आणि भारतीय लष्कराचा इशारा
पाकच्या संरक्षणमंत्र्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता खरी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “मला संघर्ष वाढवायचा नाही, पण धोका खरा आहे आणि मी ते नाकारू शकत नाही. जर युद्धाची वेळ आली, तर ईश्वरकृपेने आम्ही पूर्वीपेक्षा चांगला परिणाम साधू.”
"Chances of war with India are real and I am not denying that": Khawaja Asif, PaK Def Min
— OsintTV 📺 (@OsintTV) October 8, 2025
"History shows that India was never one united nation, except briefly under Aurangzeb. Pakistan was created in the name of Allah. At home we argue and compete. In a fight with India we… pic.twitter.com/e1yAxSTSSx
दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आसिफ यांचे हे विधान आले आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला होता.
जनरल द्विवेदी म्हणाले होते, “पाकिस्तानने एकतर दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे, अन्यथा जगाच्या नकाशावरून पाक नष्ट होईल. भारत यावेळी पूर्णपणे तयार आहे. ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये आम्ही जो संयम दाखवला, तो यावेळी दाखवला जाणार नाही. यावेळी कारवाई अशी होईल की पाकिस्तानला आपल्या भौगोलिक अस्तित्वाचा विचार करावा लागेल.”
इतिहासावर आसिफ यांचा आधारहीन दावा
ब्रिटिश वसाहतवाद्यांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या सात दशकांपासून भारत एक स्थिर आणि एकसंध लोकशाही देश म्हणून उभा आहे. याउलट, पाकिस्तानने अनेक लष्करी बंड आणि गृहकलह पाहिले आहेत. आसिफ यांनी केलेल्या दाव्याच्या विपरीत, औरंगजेबाच्या राजवटीपूर्वीच मौर्य साम्राज्याने (322 ते 185 BCE) भारतीय उपखंडाचा मोठा भाग एका राज्याखाली आणला होता.
पुढे गुप्त वंशाचे समुद्रगुप्त आणि पुष्यभूती वंशाचे हर्षवर्धन यांनीही प्राचीन भारताच्या मोठ्या भागाला राजकीय एकता मिळवून दिली होती. औरंगजेबाच्या राजवटीत साम्राज्याचा सर्वाधिक भौगोलिक विस्तार झाला असला तरी ती कारकीर्द सततच्या युद्धांनी आणि बंडाळीने भरलेली होती.
हे देखील वाचा – कफ सिरपमुळे 20 बालकांचा मृत्यू; आता DGHS ने राज्यांना दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश