Pakistan International Airlines : आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान सरकारने (Pakistan government)राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे खाजगीकरण (Privatization) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.ही एअरलाइन्स आरिफ हबीब ग्रुपने (Arif Habib Group) ४८२ दशलक्ष डॅालरमध्ये(१३५ अब्ज रुपये) विकले. इस्लामाबादमध्ये (Islamabad)झालेल्या लिलावात बोली उघडल्यानंतर पाकिस्तानी सरकारने १०० अब्ज रुपयांची मूळ किंमत जाहीर केली होती.

या लिलावात आरिफ हबीब ग्रुप (Arif Habib Group), लकी सिमेंट (, Lucky Cement)आणि एअरब्लू (Airblue)यांनी सहभाग घेतला होता. लिलावात लकी सिमेंटनेही १०१.५० अब्ज डॉलर आणि एअरब्लूने २६.५ अब्ज डॉलर्सची बोली सादर केली होती. या एअरलाइन्सच्या ७५ टक्के शेअरचा लिलाव केला. यशस्वी बोली लावणाऱ्याला उर्वरित २५ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी असणार आहे.आरिफ हबीब ग्रुप हा चार कंपन्यांचा समूह आहे.ते खतांपासून ते शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. आरिफ हबीब ग्रुप हा पाकिस्तानच्या सर्वात अनुभवी कॉर्पोरेट हाऊसपैकी एक मानला जातो.

या एअरलाइन्सकडे ३२ विमाने (aircraft) असून त्यात एअरबस (Airbus)ए३२०, बोईंग (Boeing)७३७, एअरबस ए३३० आणि बोईंग ७७७ सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा दबाव आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अंदाजे ७ अब् डॅालरच्या बेलआउट पॅकेजची आवश्यकता आहे आणि त्या बदल्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तोट्यात असलेल्या सरकारी कंपन्यांना खाजगी हाती सोपवू इच्छित आहे.
हे देखील वाचा –
15 वर्षांनंतर कोहली तर 7 वर्षांनंतर रोहित विजय हजारे ट्रॉफीत खेळणार; पाहा कधी मैदानावर उतरणार?









