Shehbaz Sharif | पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी भारतासोबतच्या अलीकडील संघर्षादरम्यान अणुबॉम्बच्या वापराच्या शक्यतेचा इन्कार केला आहे. इस्लामाबादमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या देशाचा आण्विक कार्यक्रम केवळ शांततापूर्ण उद्देशांसाठी आणि आत्मरक्षणासाठी आहे, आक्रमकतेसाठी नाही.
गेल्या महिन्यातील भारतासोबतच्या लष्करी संघर्षाबाबत बोलताना शरीफ यांनी सांगितले की, भारतीय हल्ल्यांमध्ये 55 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला. त्याचवेळी, पाकिस्तानने ‘पूर्ण शक्तीने’ प्रत्युत्तर दिल्याचा दावा त्यांनी केला.
22 एप्रिल रोजी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 7 मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते. यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला होता.
अणुकार्यक्रमावर स्पष्टीकरण
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला होणार होता का? असा प्रश्न शाहबाज शरीफ यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट केले की, “पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी आणि राष्ट्रीय संरक्षणासाठीच आहे.”
झरदारी आणि मुनीरच्या अफवा फेटाळल्या
शरीफ यांनी आसिफ अली झरदारी यांना राजीनाम्यासाठी दबाव किंवा लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या अध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या अफवाही खोडून काढल्या. “मुनीर यांनी कधीच अशी इच्छा व्यक्त केली नाही, ना अशी योजना आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी झरदारी, मुनीर आणि स्वतः यांच्यात परस्पर आदराचे नाते असल्याचेही नमूद केले.
हे देखील वाचा –