Home / देश-विदेश / Pahalgam Attack | भारताची पाकच्या पंतप्रधानांवर ‘डिजिटल स्ट्राईक’, शहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनेल ब्लॉक

Pahalgam Attack | भारताची पाकच्या पंतप्रधानांवर ‘डिजिटल स्ट्राईक’, शहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनेल ब्लॉक

Pakistan PM Shehbaz Sharif’s YouTube channel blocked | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत आणि पाकिस्तानमधील...

By: Team Navakal
Pakistan PM Shehbaz Sharif's YouTube channel blocked

Pakistan PM Shehbaz Sharif’s YouTube channel blocked | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून पाकिस्तानी कलाकार, वृत्त वाहिन्यांचे युट्यूब चॅनेल व सोशल मीडिया अकाउंट्स देशात ब्लॉक करण्यात आले आहेत.

आता पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांचे यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.  “राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक आदेशाशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही. ” असा संदेश ब्लॉक केलेल्या त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर दिसत आहे.

त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट उघडण्याचा प्रयत्न केल्यास, “भारतात हे खाते उपलब्ध नाही. कायदेशीर विनंतीचे पालन करून आम्ही ही सामग्री प्रतिबंधित केली आहे,” असा संदेश दिसत आहे. मात्र, त्यांचे ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंट सुरू होते.

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिक नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलली जात आहेत.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, हानिया अमीर, सनम सईद आणि अली जफर यांचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. अलीकडेच, लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि गायक आतिफ असलम यांचेही इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले.

याशिवाय, डॉन न्यूज, इरशाद भट्टी, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स, जीएनएन, उझैर क्रिकेट, उमर चीमा एक्सक्लुझिव्ह, अस्मा शिराझी, मुनीब फारूक, सुनो न्यूज आणि राझी नामा या यूट्यूब चॅनेलवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या