Home / देश-विदेश / एकावर हल्ला तर दुसरा मदतीला जाणार; पाकिस्तान-सौदी अरेबियामध्ये ‘संरक्षण करार’; भारताची मोठी प्रतिक्रिया

एकावर हल्ला तर दुसरा मदतीला जाणार; पाकिस्तान-सौदी अरेबियामध्ये ‘संरक्षण करार’; भारताची मोठी प्रतिक्रिया

Pakistan Saudi Arabia Strategic Defence Pact: पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक ऐतिहासिक आणि सामरिक संरक्षण करार (Strategic Defence Pact) झाला...

By: Team Navakal
Pakistan Saudi Arabia Strategic Defence Pact

Pakistan Saudi Arabia Strategic Defence Pact: पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक ऐतिहासिक आणि सामरिक संरक्षण करार (Strategic Defence Pact) झाला आहे. या करारानुसार, दोन्ही देशांनी एकमेकांवरील कोणत्याही आक्रमणाला संयुक्तपणे प्रत्युत्तर देण्याचे मान्य केले आहे.

या करारावर आता भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याची तयारी करत आहे.

पाकिस्तान-सौदी अरेबियामधील करार काय आहे?

या कराराला ‘सामरिक संरक्षण करार’ असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यादरम्यान यावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारानुसार, कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला दोन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल.

रिपोर्टनुसार, या करारामुळे पाकिस्तानने आपले अण्वस्त्र सौदी अरेबियासाठी खुले केले आहेत. हा करार दोहा येथे झालेल्या 40 इस्लामिक राष्ट्रांच्या शिखर बैठकीनंतर झाला आहे, जिथे गाझावर इस्रायलच्या हल्ल्यानंतर ‘नाटो’सारखी युती करण्याची चर्चा झाली होती.

या करारावर भारताची भूमिका

या कराराबाबत भारताला आधीपासून माहिती होती, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. “सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात सामरिक संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्याचे अहवाल आम्ही पाहिले आहेत. या करारावर दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती, याची आम्हाला कल्पना होती.

आम्ही या घडामोडीचे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि प्रादेशिक तसेच जागतिक स्थिरतेवर काय परिणाम होतात, याचा अभ्यास करत आहोत,” असे जयस्वाल यांनी माध्यमांना सांगितले. तसेच, भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आणि सर्व स्तरांवर सर्वसमावेशक राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतासाठी का आहे हा करार महत्त्वाचा?

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील हा करार भारतासाठी अधिक महत्त्वाचा बनला आहे.

हे देखील वाचा माणसाचा ‘मेंदू खाणारा अमिबा’ काय आहे? आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू; जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts