Most Expensive Property India: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचे पहिले अधिकृत निवासस्थान असलेला दिल्लीतील ऐतिहासिक बंगला लवकरच विकला जाण्याची शक्यता आहे. मोतीलाल नेहरू मार्गावरील हा बंगला सुमारे 1,100 कोटी रुपयांना विकला जाईल, असा अंदाज आहे.
जर हा व्यवहार पूर्ण झाला तर हा भारतातील सर्वात महागडा निवासी मालमत्ता व्यवहार ठरू शकतो.
कोण खरेदी करत आहे हा बंगला?
‘द इकोनॉमिक टाइम्स’ च्या रिपोर्टनुसार, लुटियन्सच्या बंगलो झोन (LBZ) मध्ये असलेला हा बंगला देशातील एका प्रतिष्ठित पेय उद्योजकाने विकत घेतला आहे. सध्या या बंगल्याचे मालक राजस्थानच्या एका पूर्वीच्या राजघराण्याचे सदस्य आहेत, ज्यांची नावे राज कुमारी कक्कर आणि बीना राणी आहेत.
सुरुवातीला त्यांनी या मालमत्तेसाठी 1,400 कोटींची मागणी केली होती, परंतु वाटाघाटीनंतर हा व्यवहार सुमारे 1,100 कोटींवर निश्चित झाल्याचे दिसते.
या मालमत्तेचे महत्त्व काय?
3.7 एकरमध्ये पसरलेल्या या बंगल्याची केवळ जागा आणि किंमतच नाही, तर त्याचे ऐतिहासिक महत्त्वही आहे. 24,000 चौरस फुटांचे बांधकाम असलेल्या या बंगल्यात पंडित नेहरू तीन मूर्ती भवनात जाण्यापूर्वी राहत होते.
ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांनी 1912 ते 1930 या काळात डिझाइन केलेला हा 28 चौरस किलोमीटरचा परिसर अजूनही भारतातील सर्वात खास आणि सुरक्षित निवासी परिसर मानला जातो.
या भागात मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी, न्यायाधीश आणि भारतातील काही सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंबे राहतात. या परिसरातील सुमारे 3,000 बंगल्यांपैकी फक्त 600 बंगले खाजगी मालकीचे आहेत, त्यामुळे त्यांची किंमत खूप जास्त आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
देशातील सर्वोत्तम कॉलेज कोणते? पाहा NIRF रँकिंग 2025 ची संपूर्ण यादी
थेट अजित पवारांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा कोण आहेत?
मंडल वरून शिवसेना सोडली आता मंत्रिपद सोडणार का? राऊतांचा भुजबळांना सवाल