लखनौ- जीव घेतलात तरी मराठी मी बोलणार नाही, असे वक्तव्य भोजपुरी अभिनेता आणि गायक (Bhojpuri actor and singer Pawan Singh) पवन सिंह याने केले आहे. त्रिभाषा सूत्रावरुन सध्या महाराष्ट्रात वाद सुरू असून महाराष्ट्रात (Maharashatra)राहणार्यांना मराठी बोलता आलेच पाहिजे, अशी भूमिका उबाठा आणि मनसे या पक्षांनी घेतली आहे. यातून काही मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या वादात आता पवन सिंह यानेदेखील उडी घेतली आहे.
पवन सिंह म्हणाला की, माझा जन्म बंगालमध्ये झाला आहे. पण तरी मला बंगाली भाषा येत नाही. मला वाटत नाही की, ही भाषा मी कधी शिकू शकेन. म्हणून मी बंगाली भाषेत बोलतही नाही. मला मराठीही येत नाही. मला हिंदी बोलायचा अधिकार आहे. महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी आलेच पाहिजे, असे म्हणणे हा घमेंडीपणा आहे. मी काम करण्यासाठी मुंबईत येतो. जास्तीत जास्त काय होईल? लोक मला मारतील. मला मरणाची भीती नाही. मला मराठी येत नाही. जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही.