Home / देश-विदेश / Piyush Pandey : जाहिरात किंग पीयूष पांडे काळाच्या पडद्याआड..

Piyush Pandey : जाहिरात किंग पीयूष पांडे काळाच्या पडद्याआड..

Piyush Pandey : देशातील जाहिरात गुरू पद्मश्री पियुष पांडे (Piyush Pandey) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७० व्या वर्षी...

By: Team Navakal
Piyush Pandey

Piyush Pandey : देशातील जाहिरात गुरू पद्मश्री पियुष पांडे (Piyush Pandey) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७० व्या वर्षी मुंबईत त्यांच निधन झालं. पियुष पांडे(Piyush Pandey) यांनी अजरामर जाहिराती तसेच “मिले सूर मेरा तुम्हारा” हे अजरामर गाणे लिहिले आहे. “अबकी बार मोदी सरकार” हे घोषवाक्य सुद्धा नीरज पांडे यांच्या संकल्पनेतुन निर्माण झाले आहे.

काही अहवालानुसार ते गंभीर संसर्गाशी झुंजत होते. पियुष पांडे यांनी २०१४ मध्ये भाजपचे घोषवाक्य “अबकी बार मोदी सरकार” देखील तयार केले होते, जे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. पियुष पांडे यांनी पल्स पोलिओ जाहिरात “दो बूंदे जिंदगी की” हि लोकप्रिय जाहिरात देखील तयार केली.

त्यांच्या मृत्यूनंतर सगळेकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे. ते म्हणतात “पियुष पांडे त्यांच्या सर्जनशीलतेसाठी ओळखले जात होते. त्यांनी जाहिरातीच्या जगात देखील प्रचंड योगदान दिले. त्यांच्याशी वर्षानुवर्षे झालेल्या संवादांना मी कायमस्वरूपी जपून ठेवेन. त्यांच्या निधनाने मला प्रचंड दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझी श्रद्धांजली.”

पियुष यांनी वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी जाहिरात जगतात पहिले पाऊल ठेवले. भाऊ प्रसून पांडे यांच्याकडून त्यांनी त्यांच्या कामाचा श्रीगणेशा केला. दोघांनीही दररोजच्या उत्पादनांसाठी रेडिओ जिंगल्समध्ये आवाज दयायला सुरवात केली. ते १९८२ मध्ये ओगिल्वी या जाहिरात कंपनीत सामील झाले होते. १९९४ मध्ये त्याला ओगिल्वीच्या बोर्डावर नामांकन मिळाले. आणि २०१६ मध्ये भारत सरकारने पीयूषला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय, २०२४ मध्ये त्यांना एलआयए लेजेंड पुरस्कार देखील मिळाला आहे.

पियुष पांडे यांनी ५० दिवसांत “अबकी बार मोदी सरकार” हि बहारदार मोहीम बनवली होती. त्यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की, या मोहिमेमागे मोदींच्या प्रतिमेवर आणि चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करून संशोधन करण्यात आले होते. ओळी सामान्य संभाषणात्मक भाषेत लिहिल्या गेल्या होत्या, त्यामुळे लोकांना अधिक सहजपणे एकमेकांशी जोडता आले. त्यांनी सांगितले कि त्यांच्या टीमने ५० दिवसांत दररोज २०० हून अधिक टीव्ही जाहिराती, तसेच १०० हून अधिक रेडिओ जाहिराती आणि १०० पेक्षा अधिक प्रिंट जाहिराती तयार केल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देखील एक्सवर पोस्ट शेअर करत पांडे यांना आदरांजली वाहिली आहे. “श्री पियुष पांडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले असे त्या म्हणाल्या. भारतीय जाहिरात विश्वातील ते एक अत्यंत महान व्यक्ती होते. दररोजच्या जीवनातील संवाद, इथल्या मातीतील विनोदाचे त्यांनी सुंदर आणि अर्थपूर्ण जाहिरातीमध्ये रुपांतर केले. विविध प्रसंगी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली. त्यांचे काम पुढील पिढ्यांना असेच प्रेरणा देत राहील”, असे सीतारमण म्हणाल्या.


हे देखील वाचा –

Pune Crime News : पत्नीने गळा आवळून केला पतीचा खून..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या