रशियात विमान कोसळले; ४९ जणांचा जागीच मृत्यू

Plane crashes in Russia

मॉस्को- रशियामध्ये (Russia) आज सायबेरियाच्या अंगारा एअरलाइन्सचे विमान (Angara Airlines plane crash) कोसळले. या विमानात ६ क्रू मेंबर्ससह एकूण ४९ प्रवासी होते. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एएन-२४ ट्विन टर्बोप्रॉप (AN-24 twin turboprop) हे विमान ब्लागोवेश्चेन्स्क (Blagoveshchensk) येथील टिंडा येथे जात होते. यावेळी चीन सीमेजवळील अमूर प्रदेशात ते कोसळले. विमान खाली कोसळताच त्याचे तुकडे तुकडे झाले. या अपघातानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

याबाबत स्थानिक वृत्तसंस्थांनी माहिती दिली की, हे विमान टिंडा शहराच्या दिशेने जात होते. त्यावेळी विमानतळावर पोहचण्यापूर्वीच हवाई वाहतूक यंत्रणाशी त्याचा संपर्क तुटला. ते गंतव्यस्थानाच्या काही किलोमीटर आधी रडारवरून गायब झाले. त्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळल्याची माहिती समजली. या विमानात ५ लहान मुलांसह ४३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. या विमानाचे तुकडे झाल्याने यातील एकही प्रवासी जिवंत राहिला नाही. सध्या घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे