Pradhan Mantri Viksit Bharat Rojgar Yojana: 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (79th Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून (Red Fort) देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केली. त्यांनी तरुणांसाठी ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ (Pradhan Mantri Viksit Bharat Rojgar Yojana) सुरू करत असल्याचे सांगितले.
त्यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना 1 लाख कोटी रुपयाच्या ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात (Private sector) पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना थेट 15,000 रुपये दिले जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही योजना फक्त रोजगार मिळवणाऱ्यांसाठीच नाही, तर कंपन्यांनाअधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देईल. या योजनेमुळे सुमारे 3.5 कोटी नवीन रोजगार संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ योजनेंतर्गत आता पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरूणांना 15 हजार रुपये दिले जाणार आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरूणांना देखील याचा फायदा मिळेल.
तंत्रज्ञान आणि जीएसटीवरही भर
देशाला संबोधित करताना मोदींनी सेमीकंडक्टर क्षेत्र आणि जीएसटीबाबतही मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, 50-60 वर्षांपूर्वी संधी असूनही भारताने ती गमावली होती. पण आता भारत ‘मिशन मोड’वर काम करत आहे आणि या वर्षाच्या अखेरीस ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येतील.
पंतप्रधान मोदींनी यंदाच्या दिवाळीपर्यंत जीएसटीच्या पुढच्या टप्प्यातील सुधारणा सुरू करण्याची मोठी घोषणा केली. त्यांनी याला नागरिकांसाठी एक मोठे गिफ्ट म्हटले. या सुधारणांमुळे जीएसटीची रचना सोपी होईल आणि सर्वसामान्यांसाठी व्यवहार अधिक सुलभ होतील.