Home / देश-विदेश / पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला मणिपूरला भेट देण्याची शक्यता’; हिंसाचारानंतर पहिला संभाव्य दौरा

पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला मणिपूरला भेट देण्याची शक्यता’; हिंसाचारानंतर पहिला संभाव्य दौरा

PM Modi Manipur Visit

PM Modi Manipur Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 13 सप्टेंबर रोजी मिझोरम आणि मणिपूरला भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान आपल्या दौऱ्याची सुरुवात मिझोरमपासून करतील. येथे ते 51.38 किलोमीटर लांबीच्या नवीन बैराबी-सैरंग रेल्वे लाईनचे उद्घाटन करणार आहेत.

मिझोरमनंतर ते मणिपूरमधील हिंसाचार झालेल्या भागाचा दौरा देखील करण्याची शक्यता आहे. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.

केंद्राच्या ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ अंतर्गत कनेक्टिव्हिटी वाढवून ईशान्य भारताचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीने हा रेल्वे प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही रेल्वे लाईन ऐझॉलला आसाममधील सिल्चरमार्गे देशाच्या उर्वरित भागाशी जोडेल, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराच्या संधी वाढतील.

मणिपूरमधील हिंसाचारानंतर मोदींचा पहिला संभाव्य दौरा

मिझोरममधील कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी मणिपूरला जातील अशी अपेक्षा आहे. मे 2023 पासून सुरू झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर त्यांनी अद्याप मणिपरला भेट दिलेली नाही. यावरून विरोधकांकडून टीका देखील होते. पंतप्रधान मणिपूरला गेल्यास हिंसाचाराच्या घटनेनंतर त्यांचा हा राज्याचा पहिलाच दौरा असेल.

मणिपूरमधील वांशिक हिंसाचार आणि राजकीय स्थिती

पंतप्रधानांचा मणिपूर दौरा वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचा आहे. मे 2023 पासून राज्यात मैतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. या अशांततेमुळे आतापर्यंत किमान 60 लोकांचा बळी गेला आहे, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी राजीनामा दिल्यानंतर, 13 फेब्रुवारी 2025 पासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

कॅन्सरमुळे प्रिया मराठेचे निधन; जाणून घ्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आणि उपाय

“आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन

Share:

More Posts