PM Modi on Trump Tariff: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50% आयात शुल्क (tariff) लादण्याच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi on Trump Tariff) यांनी ठाम भूमिका घेतली आहे. अमरेकिच्या या आर्थिक दबावाला न जुमानता भारत मार्ग काढेल, असे मोदींनी म्हटले आहे. अहमदाबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “दबाव कितीही आला, तरी आपण तो झेलण्याची आपली ताकद वाढवत राहू.”
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाने भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त 25% आयात शुल्क लागू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हे शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. यामुळे भारतावरील एकूण शुल्क 50% होईल. कोणत्याही देशाचे किंवा ट्रम्प यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज आपण जगात आर्थिक स्वार्थावर आधारित धोरणे पाहत आहोत.”
शेतकरी, व्यापाऱ्यांना आश्वासन
या आयात शुल्काची अंमलबजावणी होण्यास फक्त दोन दिवस शिल्लक असताना, पंतप्रधानांनी देशाला आश्वासन दिले की, भारत अशा संरक्षणवादी उपायांविरुद्ध ठाम उभा राहील आणि आपल्या नागरिकांच्या हिताला प्राधान्य देईल.
छोट्या दुकानदारांना, शेतकऱ्यांना, पशुपालकांना आणि लहान उद्योजकांना संबोधित करताना ते म्हणाले, “गांधींच्या भूमीतून मी पुन्हा पुन्हा वचन देतो.माझ्यासाठी तुमचे हित सर्वोपरी आहे. माझे सरकार लहान उद्योजक, पशुपालक किंवा शेतकऱ्यांचे कधीही नुकसान होऊ देणार नाही.”
आयात शुल्कामागचे कारण
रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून ट्रम्प यांनी भारतावर हे अतिरिक्त शुल्क लादले आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, भारत आपला मित्र असला तरी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध फारसे वाढले नाहीत, कारण भारताचे आयात शुल्क जगातील सर्वाधिक शुल्कांपैकी एक आहे.
अमेरिकेच्या दबावानंतरही भारत युके, युरोपियन युनियन (EU), ईएफटीए (EFTA) आणि आसियान (ASEAN) यांसारख्या देशांसोबत व्यापार वाटाघाटी पुढे नेत आहे.
हे देखील वाचा-
मंत्री शिरसाट यांच्या विरोधात पुरावे रोहित पवारांनी राजीनामा मागितला