PM Modi on Delhi Blast : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ काल सायंकाळी झालेल्या स्फोटाच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत 10 पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, 24 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भीषण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ आपली प्रतिक्रिया दिली असून गृहमंत्री अमित शाह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले, “दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्याबद्दल मी तीव्र दुःख व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी माझी प्रार्थना आहे. अधिकारी पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहेत. मी गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.”
स्फोटाची नेमकी घटना
काल (10 नोव्हेंबर) सायंकाळी 6.52 वाजता लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या Hyundai I20 कारमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, आजूबाजूच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आणि काचांचे तुकडे सर्वत्र पसरले होते.
Condolences to those who have lost their loved ones in the blast in Delhi earlier this evening. May the injured recover at the earliest. Those affected are being assisted by authorities. Reviewed the situation with Home Minister Amit Shah Ji and other officials.@AmitShah
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2025
तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच 10 मिनिटांच्या आत दिल्ली क्राइम ब्रँच आणि विशेष शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आता देशातील प्रमुख तपास संस्था NIA (राष्ट्रीय तपास संस्था) आणि NSG (राष्ट्रीय सुरक्षा दल) तसेच FSL (न्यायिक विज्ञान प्रयोगशाळा) च्या टीमने तपासाला सुरुवात केली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि NIA, IB (गुप्तचर विभाग) प्रमुखांकडून सातत्याने परिस्थितीची माहिती घेतली. शाह यांनी सांगितले की, सर्व शक्यतांचा विचार करून सखोल तपास केला जाईल आणि आसपासचे सर्व सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे तपासण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याच दिवशी फरिदाबादमध्ये 2,900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली असल्याने, तपास यंत्रणा या घटनेचा संबंध आहे का, याचाही कसून तपास करत आहेत.
हे देखील वाचा –
ट्रम्प यांची ‘लाडकी बहीण’ योजना! अमेरिकेतील नागरिकांना देणार 2,000 डॉलर









