PM Modi Trump Call: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या तेल खरेदीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) यावर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवर कोणतेही बोलणे झाले नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात काल काही संभाषण किंवा दूरध्वनी झाला होता का? या प्रश्नावर बोलताना ‘मला काल दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या कोणत्याही संभाषणाबद्दल माहिती नाही’,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ट्रम्प यांचा नेमका दावा काय होता?
यापूर्वी ट्रम्प यांनी दावा केला होता की, पंतप्रधान मोदींनी त्यांना आश्वासन दिले आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. युक्रेन संघर्षादरम्यान मॉस्कोवर जागतिक दबाव वाढवण्याच्या दिशेने हे “एक मोठे पाऊल” असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.
ट्रम्प यांनी सांगितले की: “होय, नक्कीच. ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) माझे मित्र आहेत. आमचे उत्तम संबंध आहेत… भारत तेल खरेदी करत असल्याबद्दल मी समाधानी नव्हतो. आणि त्यांनी आज मला आश्वासन दिले की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. ही एक मोठी रोक आहे. आता आम्हाला चीनलाही असेच करायला लावायचे आहे.”
भारताची ऊर्जा नीती
ट्रम्प यांच्या या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच एका निवेदनात स्पष्ट केले होते की, भारताचे ऊर्जा धोरण पूर्णपणे राष्ट्रीय हित आणि अस्थिर बाजारपेठेमध्ये भारतीय ग्राहकांचे हित जपण्याच्या गरजेनुसार चालते.
परराष्ट्र मंत्रालयाने यावर भर दिला की “भारत तेल आणि वायूचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांचे हित जपण्याला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. आमची आयात धोरणे पूर्णपणे याच उद्देशाने मार्गदर्शन करतात.”
भारत स्थिर किमती आणि पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध स्त्रोतांकडून तेल खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याचे मंत्रालयाने पुन्हा सांगितले.
हे देखील वाचा – भाजपचा मोठा राजकीय डाव: गुजरातमध्ये मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार, कोणाला मिळणार संधी?