PM Modi vs Congress: काँग्रेसने (Congress) अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) कडे दुर्लक्ष केले. सगळा ईशान्य भारत (North east India) त्यांच्या नजरेतून सुटला. मला सेवेची संधी मिळताच मी काँग्रेसच्या या विचारातून देशाला मुक्ती मिळवून दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर टीका केली. आमचा हेतू या राज्यांमधून मतदान (Vote) आणि जागा (Seat) मिळवणे नाही, तर देश प्रथम ही आमची भावना असल्याचेही मोदी आज इटानगर येथील सभेत म्हणाले.
पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या दौऱ्यावर होते. सुरुवातीला ते अरुणाचलची राजधानी इटानगर येथे पोहोचले. येथे त्यांनी ५ हजार १०० कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यानंतर त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, ज्यांना कुणी कधी विचारत नव्हते, त्यांची मोदी पुजा करतो. ईशान्येकडील राज्यांचा काँग्रेसला विसर पडला होता. त्यामुळे २०१४ नंतर हा प्रदेश विकासाच्या प्राधान्यक्रमात आला. येथील आठ राज्यांना आम्ही अष्टलक्ष्मी मानून काम केले.
दरम्यान, ईशान्य भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ राज्यांचा समावेश आहे. ९ दिवसांपूर्वी पंतप्रधान हे मणिपूर दौऱ्यावरही गेले होते. दोन वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष सुरू झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच हा दौरा होता.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज पंतप्रधानांनी त्रिपुराच्या उदयपूर शहरातील त्रिपूर सुंदरी मंदिर आणि परिसर सौंदर्यीकरणाचे उद्घाटनही केले. जवळपास पाचशे वर्ष जुन्या या मंदिराचे ५२ कोटी रुपये खर्चून हे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. देशातील ५१ पैकी हे एक शक्तिपीठ आहे. येथे माता सतीचे पाय पडले होते, अशी आख्यायिका आहे.
हे देखील वाचा –
क्लबमध्ये मुलींसाठी सुविधा हव्यात!सचिन तेंडुलकर यांचे आवाहन
रक्त एकच ना? वडलांप्रमाणे जय शाहांनीही निर्णय घ्यावा!संजय राऊत यांचे विधान