PoK Protest: पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सध्या मोठे आंदोलन होत आहे. या आंदोलनाला दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून प्रयत्न केले जात आहे.
अवामी ॲक्शन कमिटी (AAC) या नागरी संघटनेने संपूर्ण प्रदेशात ‘शटर डाऊन आणि व्हील जाम’आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू राहण्याची शक्यता आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवरपाकिस्तान सरकारने मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांना तैनात केले आहे आणि जमाव जमू नये म्हणून मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा खंडित केली आहे.
आंदोलन कशासाठी आणि प्रमुख मागण्या काय आहेत?
AAC या संघटनेने गेल्या काही महिन्यांत मोठा पाठिंबा मिळवला आहे. दशकांपासून होत असलेली राजकीय उपेक्षाआणि आर्थिक दुर्लक्ष या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. AAC च्या 38 मागण्यांच्या जाहीरनाम्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- प्रतिनिधित्व: PoK विधानसभेतील 12 जागा, ज्या पाकिस्तानात राहणाऱ्या काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव आहेत त्या रद्द कराव्यात. स्थानिकांचा युक्तिवाद आहे की यामुळे स्थानिक प्रतिनिधीत्व कमी होते.
- आर्थिक सुधारणा: मंगला जलविद्युत प्रकल्पाशीनिगडीत वीज दर कमी करा आणि अनुदानित दरात पीठ (Subsidised Flour) उपलब्ध करा.
- मूलभूत हक्क: सरकारने दिलेली प्रलंबित आश्वासने आणि सुधारणा तत्काळ लागू कराव्यात.
मुझफ्फराबाद येथे आंदोलकांना संबोधित करताना AAC चे नेते शौकत नवाझ मीर यांनी स्पष्ट केले की, “आमचे हे अभियान कोणत्याही संस्थेविरुद्ध नाही, तर 70 वर्षांपासून नाकारलेल्या मूलभूत हक्कांसाठी आहे. आता खूप झाले. एकतर आमचे हक्क द्या, नाहीतर लोकांच्या क्रोधाला सामोरे जा.”
PoK मध्ये पाकिस्तानच्या सक्तीच्या ताब्यापासून स्वातंत्र्य मिळावे, असे नारे नागरिक देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत.
या आंदोलनाला चिरडण्यासाठी पाकिस्तान सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांत PoK मधील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा दलांच्या गाड्यांची फ्लॅग मार्च झाली. तसेच, पंजाबमधून हजारो सैनिकबोलावले गेले आहेत. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा – शेतकरी संकटात! शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ 5 महत्त्वाच्या मागण्या