Home / देश-विदेश / पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा! ‘एपस्टीन फाईल्स’मुळे देशाचा पंतप्रधान बदलणार? जाणून घ्या काय आहे प्रकरण

पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा! ‘एपस्टीन फाईल्स’मुळे देशाचा पंतप्रधान बदलणार? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Prithviraj Chavan Epstein Files Claim : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणावरून भारतीय राजकारणात मोठी खळबळ...

By: Team Navakal
Prithviraj Chavan Epstein Files Claim
Social + WhatsApp CTA

Prithviraj Chavan Epstein Files Claim : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणावरून भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेच्या संसदेत १९ डिसेंबर रोजी ही गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केली जाणार असून, त्यातून जगाला हादरवणारी माहिती समोर येईल, असा दावा चव्हाण यांनी केला आहे.

या फाईल्सचा परिणाम केवळ जागतिक स्तरावरच नाही, तर भारताच्या राजकारणावरही मोठ्या प्रमाणावर होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते, जेफ्री एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगभरातील बड्या नेत्यांना अल्पवयीन मुली पुरवल्या होत्या आणि या जाळ्यात भारतातील काही आजी-माजी खासदारांचाही समावेश असल्याची चर्चा अमेरिकेतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी एक धाडसी तर्क मांडला आहे की, जर या फाईल्समधून धक्कादायक नावे समोर आली, तर देशाचा पंतप्रधान बदलला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस किंवा बारामतीचा व्यक्ती नव्हे, तर नागपूरशी संबंधित असलेली एखादी भाजपची व्यक्ती पंतप्रधानपदावर बसेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

काय आहे नेमकं एपस्टीन फाईल्स प्रकरण?

जेफ्री एपस्टीन याने १९९५ सालापासून अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून जगातील शक्तिशाली राजकारण्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवल्याचा आरोप आहे. २००८ मध्ये एका १४ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर या काळ्या धंद्याचे पुरावे समोर आले होते. एपस्टीनने केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जागतिक स्तरावर एक मोठे नेटवर्क चालवून अनेक दिग्गजांना लैंगिक शोषणाच्या जाळ्यात ओढले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला, जो अनेकांच्या मते आत्महत्या नसून हत्या असावी.

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, ते जे काही बोलत आहेत ती माहिती अमेरिकेच्या संसदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या प्रकरणातील पीडित मुलींनी केलेल्या तक्रारींवरून आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांचीही नावे समोर आली आहेत. बिल गेट्स यांनी या प्रकरणातील तथ्ये मान्य केली असून, ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांनी तर न्यायालयाबाहेर तडजोड करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

१९ डिसेंबर रोजी काय होणार?

अमेरिकेत पुढील वर्षी निवडणुका होणार असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षातील खासदारांनी या फाईल्स उघड करण्यासाठी दबाव टाकला होता. त्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एक कायदा पारित करण्यात आला असून, एका महिन्याच्या आत म्हणजे १९ डिसेंबरपर्यंत या फाईल्स खुल्या करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या फाईल्समध्ये एपस्टीनच्या विमानातील प्रवाशांची यादी, त्याचे संपर्क क्रमांक आणि त्याने अडकवलेल्या लोकांची संपादित नसलेली मूळ नावे असण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी या घडामोडींचा थेट संबंध भारताच्या सद्य राजकीय स्थितीशी जोडला आहे. १९ डिसेंबर रोजी भाजपच्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले असून, या सर्व घडामोडी भारताच्या पंतप्रधानपदाच्या बदलाशी संबंधित असू शकतात, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. आता १९ डिसेंबर रोजी अमेरिकेतून बाहेर येणारी माहिती भारतीय राजकारणाची दिशा बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा – IPL 2026 Auction : आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! अनकॅप्ड खेळाडू मालामाल; पाहा संघांनी कोणत्या खेळाडूंना खरेदी केले?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या