Home / देश-विदेश / Prithviraj Chavan : एपस्टीन सेक्स स्कँडलवर पृथ्वीराज चव्हाणांचे महत्वपूर्ण दावे..

Prithviraj Chavan : एपस्टीन सेक्स स्कँडलवर पृथ्वीराज चव्हाणांचे महत्वपूर्ण दावे..

Prithviraj Chavan : मागच्या बरेच दिवसांपासून एपस्टीन फाईल्स देशात पर्यायाने संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणात मोठी मोठी...

By: Team Navakal
Prithviraj Chavan
Social + WhatsApp CTA

Prithviraj Chavan : मागच्या बरेच दिवसांपासून एपस्टीन फाईल्स देशात पर्यायाने संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणात मोठी मोठी नाव समोर येत आहेत. शिवाय या प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली मते मांडली आहेत. याच पार्शवभूमीवर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील काही दावे केले आहेत.

ते म्हणतात जी माहिती आपल्यासमोर आली आहे, त्यामध्ये ईमेल्समध्ये तसेच त्यात काही भारतीयांचे देखील उल्लेख आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेल मध्ये आढळले आहे. हरदीप पुरी हे अमेरिकेत भारताचे राजदूत देखील होते, त्यांचे नाव अनेक वेळेला यामध्ये आलं आहे, पाच-सहा वेळेला त्याच्या भेटीघाटी देखील झाल्या असा उल्लेख यात आला आहे. माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचे देखील यात नाव असल्याचे बोलले जात आहे. पुढे ते असेही म्हणतात ट्रम्प यांचा सल्लागार स्टीव बॅननने एपस्टीनला विनंती केली होती की मला पंतप्रधानांना भेटायचं आहे. यावर एपस्टीनकडून उत्तर आले की तो याबाबत प्रयत्न करत आहे, आणि नंतर काही दिवसांनी मोदी ऑन बोर्ड असल्याचा मेल त्याला येतो. मोदींच आणि एपस्टीनच काय नातं आहे की जो एपस्टीन मोदींची कुणाशीही अपॉईटमेंट घडवू शकतो याच उत्तर सरकारकडून मिळायला हवं असे स्पष्ट मत चव्हाण यांनी यावेळी मांडले.

ते पुढे म्हणतात, प्रकरण गंभीर असून सुद्धा सरकारकडून याबाबत खुलासा केला जात नाही. भारत सरकारकडून खुलासा होत नाही ही थोडी चिंतेची बाब आहे. त्यांनी सांगितले की, मी याआधी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण सगळ्यांसमोर आलं तर त्याचे भारताच्या राजकारणावर मोठा परिणाम त्याचा अमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते. असे ते म्हणतात.

ते पुढे सांगतात बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे. जर बाल लैंगिक शोषण झालेलं सिद्ध झालं किंवा त्याचा पुरावा समोर आला, तर तो अमेरिकेत गुन्हा ठरतो आणि भारतात देखील याची शिक्षा होते, अशी कायद्याची तरतूदच आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर असल्याचे ते सांगतात.

पृथ्वीराज चव्हाणांचे ९ मोठे दावे
१. हा डेटा ३०० जीबी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. लक्षावधी ईमेल्स, फोटोग्राफ आणि व्हिडिओ यामध्ये आहेत. जी माहिती आलेली आहे, ती फक्त पार्शल माहिती पुढे आली आहे.

२. जी माहिती मिळाली आहे त्यात ईमेल्स मध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेल मध्ये आढळले आहे.

३. हरदीप पुरी हे अमेरिकेत भारताचे याआधी राजदूत होते, त्यांचे नाव अनेक वेळा यात आलं आहे.

४. माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचेदेखील यात नाव आहे. अमेरिकेत राहणारे आरोग्य विषयक एक बडी व्यक्ती यात आहे, भारतीय वंशाच्या, त्यांचेही नाव आढळले आहे.

५. ट्रम्प यांचा सल्लागार स्टीव बॅनन याने एपस्टीनला विनंती केली होती की मला पंतप्रधानांना भेटायच आहे. एपस्टीनकडून उत्तर आले की तो याबाबत प्रयत्न करतोय, आणि नंतर काही दिवसांनी मोदी ऑन बोर्ड अश्या पद्धतीचा मेल त्याला आला.

६. प्रश्न असा आहे की “मोदींच आणि एपस्टीनच काय नातं आहे की जो एपस्टीन मोदींची कुणाशीही अपॉईटमेंट घडवू शकतो याच उत्तर सरकारकडून मिळणं अपेक्षित.

७. भारताच्या राजकारणावर या सगळ्याचा अमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते. जर बाल लैंगिक शोषण सिद्ध झाले किंवा त्याचा पुरावे समोर आले, तर तो अमेरिकेत मोठा गुन्हा ठरतो आणि भारतात देखील याला शिक्षा होते, अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर असणार आहे. एपस्टीन हा इस्त्रायली गुप्तहेर असल्याचे देखील ते म्हणतात.

८. पुढे ते सांगतात अमेरिकेत एक प्रचंड मोठा गुन्हा बाल सेक्स स्कॅडलच्या रूपाने १९९५-९६ पासून चालू आहे. या घटनेचा सूत्रधार जेफ्री एपस्टीन नावाचा मोठा उद्योगपती होता. त्याने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आणि उच्च पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्री केला.

९. एपस्टीनचा मृत्यू ऑगस्ट २०१९ मध्ये झाला, त्याने गळफास लावून आत्महत्या केली का त्याचा खून केला कारण तो काही बोलू नये म्हणून त्याला मारण्यात आले या संदर्भातील अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही. एपस्टीन हा इस्त्रायली गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतवून त्यांना ब्लॅकमेल करत राहायचं. असे देखील त्यांनी सांगितले.

अमेरिकन अटर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितले आहे की सर्व माहिती खुली करायला काही आठवडे लागणार आहेत. यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ देखील आहेत, त्यामुळे ते फोटो थोडे मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सध्या तिथे सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. खासदारांचे म्हणणे आहे की बहुतेक राष्ट्रपती माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असणार आहे. हा मोठा संघर्ष होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

हे देखील वाचा – Bread Breakfast Side Effects : सावधान! रोज नाश्त्यात ब्रेड खाताय? आरोग्यावर होतात ‘हे’ 5 गंभीर परिणाम

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या