Home / देश-विदेश / Rafale Jet: ‘पाकमुळे नाही तर…’, कंपनीनेच सांगितले ऑपरेशन सिंदुरमध्ये राफेलचे नुकसान होण्याचे कारण

Rafale Jet: ‘पाकमुळे नाही तर…’, कंपनीनेच सांगितले ऑपरेशन सिंदुरमध्ये राफेलचे नुकसान होण्याचे कारण

Dassault Aviation on Rafale Jet | फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनचे (Dassault Aviation) अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी पाकिस्तानच्या तीन राफेल...

By: Team Navakal
Dassault Aviation on Rafale Jet

Dassault Aviation on Rafale Jet | फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनचे (Dassault Aviation) अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी पाकिस्तानच्या तीन राफेल विमाने (Rafale Jet) पाडण्याच्या दाव्याला “अचूक आणि निराधार” असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. मे 2025 मधील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने एक राफेल विमान उंचीवर तांत्रिक बिघाडामुळे गमावले, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षात पाकिस्तान हवाई दलाने PL-15E क्षेपणास्त्रांनी तीन राफेलसह पाच भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला होता, परंतु दसॉल्टने या दाव्याला फेटाळले आहे. भारताने देखील हा दावा फेटाळला आहे.

दसॉल्टचा खुलासा

रिपोर्टनुसार, ट्रॅपियर यांनी सांगितले की, एका राफेल विमानाचे नुकसान शत्रूच्या हल्ल्यामुळे नाही तर तांत्रिक बिघाडामुळे झाले. मात्र, दसॉल्टने निवेदन जारी करत ट्रॅपियर यांनी ऑपरेशनल किंवा तांत्रिक टिप्पणी केल्याचा इन्कार केला. भारताचे संरक्षण सचिव आर. के. सिंग यांनीही पाकिस्तानने राफेल विमान पाडले नसल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते.

फ्रेंच गुप्तचर सेवेच्या निष्कर्षानुसार, चीनने राफेलच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम राबवली. फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने याला राफेल आणि फ्रान्सच्या धोरणात्मक विश्वासार्हतेवर हल्ला ठरवले. यामुळे राफेलच्या विक्रीवर परिणाम टाळण्यासाठी फ्रान्सने हे दावे खोडून काढले आहे.

दरम्यान, दसॉल्ट आतापर्यंत इजिप्त, भारत, कतार, ग्रीस, क्रोएशिया, संयुक्त अरब अमिरात, सर्बिया आणि इंडोनेशियाला 323 राफेल विमाने विकली आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या