Rahul Gandhi Criticize Amit Shah: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा कथित मतचोरींच्या मुद्यांवरून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपच्या पुढील अनेकवर्ष सत्तेत राहण्याच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे.
“भाजपचा हा दावा ‘मतचोरी’शी संबंधित आहे,” असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या जुन्या विधानाचा उल्लेख केला.
बिहारयेथे ‘व्होटर अधिकार यात्रे’मध्ये (Voter Adhikar Yatra) बोलताना राहुल गांधी म्हणाले, “अमित शाह अनेकदा म्हणाले आहेत की, भाजप सरकार 40-50 वर्षे सत्तेत राहील. हे ऐकून मला प्रश्न पडला की, त्यांना हे कसे माहित आहे? हे एक विचित्र विधान आहे.”
2014 पासून ‘मतचोरी’ सुरू
अमित शाह यांनी 2017 मध्ये मध्य प्रदेशात कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हटले होते की, “आम्ही 5-10 वर्षांसाठी नाही, तर कमीत कमी 50 वर्षांसाठी सत्तेत आलो आहोत.” याच विधानाचा संदर्भ देत राहुल गांधींनी आरोप केला की, “आज देशासमोर हे सत्य बाहेर आले आहे की भाजप ‘मतचोरी’ करते. याची सुरुवात गुजरातमध्ये झाली, 2014 मध्ये राष्ट्रीय स्तरावर आले आणि त्यानंतर इतर राज्यांमध्येही हेच होत आहे.”
बिहारमधील तरुणांनी त्यांचे सामर्थ्य दाखवले आहे, आणि या आंदोलनामुळे भाजप नेतृत्व आणि निवडणूक आयोगाला ‘मतचोरी’ करण्यापूर्वी दोनदा विचार करायला भाग पाडेल, असा दावाही त्यांनी केला.
#WATCH | मधुबनी, बिहार: कांग्रेस सांसद और लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी ने कहा, "अमित शाह कई बार कह चुके हैं कि भाजपा सरकार 40-50 साल तक चलेगी। तो मैं सोचने लगा कि उन्हें कैसे पता कि वे 40-50 साल तक सत्ता में रहेंगे? यह एक अजीब बयान था। आज देश के सामने सच्चाई आ गई है कि… pic.twitter.com/lsXUPuvACS
— ANI_HindiNews (@AHindinews) August 26, 2025
प्रियंका गांधी यांचाही टीका
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनीही मतचोरींवून भाजपवर टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत म्हटले होते की, काँग्रेस तुमची म्हैस चोरून नेईल. पण नरेंद्र मोदी स्वतः तुमची मते चोरत आहेत.” प्रियंका गांधी यांनी मतदानाला “भारतीय लोकशाहीचा पाया” आणि लोकांचा “सर्वात मौल्यवान अधिकार” असे म्हटले.
निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले
काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचा दावा आहे की, निवडणूक आयोगाच्या मदतीने विरोधी पक्षांच्या समर्थकांची नावे मतदार यादीतून हटवण्यात आली आणि भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी बनावट किंवा डुप्लिकेट नावे जोडण्यात आली.
मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप “दिशाभूल करणारे” आणि “निराधार” असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. आयोगाने राहुल गांधी यांना कागदोपत्री पुराव्यासह प्रतिज्ञापत्र (affidavit) सादर करण्यास सांगितले आहे. मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शक असून त्यात सर्व राजकीय पक्षांचा सहभाग असतो, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –