हे सरकार फक्त श्रीमंतांचेच; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Rahul Gandhi criticism of PM Modi

नवी दिल्ली – महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांच्या (Farmer suicide) घटनांमध्ये वाढ होत असतानाच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर (Central government) जोरदार टीका केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही, श्रीमंतांचे आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत म्हटले, जानेवारी ते मार्च या केवळ तीन महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे फक्त आकडे नाहीत, ही ७६७ उद्ध्वस्त कुटुंबे आहेत. ही कुटुंबे कधीही सावरू शकणार नाहीत. पण सरकार गप्प आहे. ते फक्त उदासिनतेने पाहत आहे. शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे, खते, डिझेल सगळ महाग झाले आहे. पण किमान आधारभूत दराची हमी नाही. कर्जमाफीची मागणी केली की, दुर्लक्ष केले जाते. मात्र श्रीमंतांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज सहजपणे माफ केले जाते.

याचे उदाहरण देताना राहुल गांधी यांनी अनिल अंबानींच्या ४८,००० कोटी रुपयांच्या एसबीआय फसवणुकीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले होते. परंतु शेतकरी आत्महत्यांच्या घटनांकडे बघितले तर आजचे चित्र उलट आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर नाही झाले, पण त्यांचे आयुष्य निम्मे झाले आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना हळूहळू मारत आहे आणि मोदी फक्त त्याचा तमाशा पाहत आहेत.