Pahalgam Terror Attack | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pehalgam attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 26 जणांना ‘शहीद’ (Martyr status) चा दर्जा देण्याची गुरवारी मागणी केली आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे त्यांनी हे भावनिक आवाहन केले.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर लिहिले की, “पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबांच्या दुःखात, शहीद दर्जाच्या त्यांच्या मागणीत, मी त्यांच्यासोबत उभा आहे. पंतप्रधानांना विनंती आहे की, या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना हा सन्मान देऊन त्यांच्या कुटुंबांच्या भावनांचा आदर करावा.”
पहलगाम हमले में मारे गए लोगों के परिवारों के दुख में, शहीद के दर्जे की उनकी मांग में, मैं साथ खड़ा हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2025
प्रधानमंत्री से आग्रह है कि वो इस त्रासदी में जान गंवाने वालों को यह सम्मान देकर उनके परिवारों की भावना का आदर करें। pic.twitter.com/auMEehEnOO
कानपूर दौऱ्यात राहुल गांधी यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला असून, त्यात शुभमच्या पत्नीने या “मला काही नको, फक्त शुभमला शहीद म्हणून ओळख मिळावी.”, असे म्हणताना दिसत आहे.
शुभमचे वडील संजय द्विवेदी यांनी देखील गांधींना विनंती केली की, “तुम्ही सरकारशी आणि पंतप्रधानांशी बोलू शकता. आम्हाला न्याय मिळवून द्या.”
नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी हल्ल्यातील मृतांना थंड डोक्याने मारल्याचा आरोप करत, त्यांना शहीद दर्जा मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. “हा मुद्दा जात-जनगणनेपेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे,” असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं की, पंतप्रधान मोदींना त्यांनी या मागणीसाठी विशेष अधिवेशनासाठीचे पत्र लिहिलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही संजय द्विवेदी यांच्याशी संवाद साधून ही मागणी रास्त असल्याचं मान्य केलं आहे.