Rahul Gandhi : देशाच्या प्रत्यक भागात सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे निवडणुकीची. मागच्या बऱ्याच काळापासून मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरु असलयाचे दिसून येते. अश्याच आज राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यात महाराष्ट्र प्रमाणेच हरियाणामध्येही निवडणूक (Haryana Election) चोरली असून २५ लाख बोगस मतदान झाल्याचा थेट आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. ब्राझिलच्या मॉडेलच्या नावाने हरियाणात तब्बल २२ वेळेला मतदान करण्यात आल होत, ब्राझिलच्या महिलेचं हरियाणात मतदान कास? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
आता राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने (Election Commission) सडेतोड उत्तर दिलं आहे. काँग्रेसकडून या संधर्भात एकही तक्रार आली नाही, तसेच मतदान होत असताना काँग्रेसच्या पोलिंग एजंट्सनी या संधर्भात काहीच आक्षेप का घेतला नाही. असा प्रतिप्रश्न देखील योगाने केला. तसेच या संबंधी राहुल गांधी यांनी कोर्टात जावे असा सल्लाही आयोगाने दिल्याची माहिती आहे.
राहुल गांधींना यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी निवडणूक आयोगामध्ये रितसर या संधर्भात तक्रार करावी, तसेच या बद्दलचे पुरावे द्यावेत असं आयोगाने म्हटलं आहे. तसेच राहुल गांधींना उच्च न्यायालयाचे दरवाजे देखील खुले असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.
पुढे बनावट मतदारांच्या (Fake Voters) मुद्द्यावरही निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. मतदार यादीतील दुरुस्तीदरम्यान (Voter List Revision) काँग्रेसचे बीएलए (Booth Level Agents) यांनी एकाही नावाबद्दल दावा किंवा हरकत तेव्हाच का घेतली नाही? जरी हे मतदार बनावट असले तरी, त्यांनी भाजपलाच (BJP) मतदान केलं हे कशावरून? असा प्रतिप्रश्न निवडणुक आयोगाकडून करण्यात आला.
हे देखील वाचा –









