Rahul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ (Voter Adhikar Yatra) करत आहे. त्यांच्या सभेला मोठी गर्दी होत असल्याचेही दिसून येत आहे. या दरम्यान अनेकजण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता यात्रेदरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बिहारच्या पूर्णिया येथे बाईक रॅलीतराहुल गांधी यांना एका तरुणाने किस करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Rahul Gandhi Viral Video) होत आहे, ज्यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) एका जीपमधून उतरून बाईक रॅलीत सहभागी झाले. या रॅलीदरम्यान राहुल गांधी स्वतः बाईक चालवत होते आणि त्यांच्या मागे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राम बसले होते.
RG ko kiss kr liya ek ladke ne security wale ne thappad de diya😂 pic.twitter.com/Kmm2JUIsBQ
— Parinda🕊 (@Parthian_1) August 24, 2025
दरम्यान, गर्दीतून एक तरुण सुरक्षा व्यवस्थेचा मोडत थेट राहुल गांधींच्या अगदी जवळ पोहोचला. त्याने राहुल गांधींना किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि त्याला रोखले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या तरुणाला एका सुरक्षा कर्मचाऱ्याने कानशिलात लगावली, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होत असताना अनेकजण ही घटना राहुल गांधींच्या सुरक्षेतील मोठी चूक असल्याचे म्हणत आहे. आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही, तो तरुण राहुल यांच्या इतका जवळ कसा पोहोचला, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
हे देखील वाचा –
’10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप
मंदिरांतील राजकारणावर केरळ हायकोर्टाची बंदी
9 कॅरेट सोने नक्की काय आहे? किंमत-शुद्धेपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती