Home / देश-विदेश / Rahul Vaidya : गोवा- मुंबई विमान प्रवास पडला ४ लाखांना; गायकाने सोशल मीडियावर व्यक्त केलं दुःख..

Rahul Vaidya : गोवा- मुंबई विमान प्रवास पडला ४ लाखांना; गायकाने सोशल मीडियावर व्यक्त केलं दुःख..

Rahul Vaidya : सेलेब्रिटी गायक म्हटलं कि इव्हेंटसाठी का होईना कायमच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणी जावं लागत. इव्हेंट्साठी जाताना कलाकार...

By: Team Navakal
Rahul Vaidya
Social + WhatsApp CTA

Rahul Vaidya : सेलेब्रिटी गायक म्हटलं कि इव्हेंटसाठी का होईना कायमच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणी जावं लागत. इव्हेंट्साठी जाताना कलाकार नेहमीच विमान प्रवासाचा सोईस्कर पर्याय निवडतात. कारण विमान प्रवास नेहमीच सुखकर होतो. पण एका प्रसिद्ध मराठी गायकाला फक्त गोव्याहून मुंबईला येण्यासाठी तब्बल ४ लाखाचा फटका बसला आहे.

या गायकाने त्याच्या इन्स्टाग्रामवर हँडेलवर याबाबत पोस्ट केली आहे. त्याने विमानाची तिकिटं शेअर करत ही माहिती दिली. गोव्याहून मुंबईला येण्यासाठी तब्ब्ल ४ लाख रुपये का? यामागचं कारण देखील या गायकाने स्पष्ट केले आहे.

हा प्रसिद्ध मराठी गायक या आधी ‘बिग बॉस हिंदीच्या घरात देखील झळकला होता. हा गायक म्हणजे राहुल वैद्य. राहुल वैद्य नुकताच गोव्याहून विमानानं मुंबईत आला. त्याला या विमान प्रवासासाठी त्याला तब्बल ४ लाख रुपये इतकी मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेयर करत लिहले कि “टेकऑफ करण्यासाठी आजचा दिवस तर सर्वात वाईट होता. उद्या रात्री कोलकात्यात आमचा शो आहे आणि आम्ही तिथे कसं पोहोचणार आहोत, तेच मला माहिती नाही!”

राहुल वैद्यनं दुसऱ्या स्टोरीमध्ये लिहल आहे कि, “हे बोर्डिंग पास ४.२० लाखांचे आहेत, आणि तेही फक्त मुंबईपर्यंतचे. आणि आता मुंबई ते कोलकाता हा वेगळा खर्च. माझ्या आयुष्यातील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा डोमेस्टिक प्रवास ठरणार असलयाचे देखील त्याने त्या स्टोरीमध्ये म्हटले आहे.”

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो एअरलाइन्स अतिशय गंभीर ऑपरेशनल समस्यांशी झुंज देत आहे. यामुळे शेकडो टेक ऑफ काही तास उशिराने किंवा रद्द करण्यात आली आहेत. गेल्या २४ तासांत ५०० हून प्लेन टेकऑफ रद्द करण्यात आली असल्याची माहिती आहे. आणि यामधून राहुल वैद्य देखील सुटू शकला नाही.

माध्यमांशी बोलताना राहून ने यावर अधिक स्पष्टता दिली आहे. तो म्हणाला, “दुपारी १.१५ ची फ्लाइट होती आणि संध्याकाळी कोलकाताला माझा शो होता. मला काही करून त्याठिकाणी पोहोचायचं होतं. आणि एक तास आधी फ्लाइट पोस्टपोन झाल्याची अनाउन्समेंट करण्यात आली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या एअरपोर्टला निघालो. आणि तिथे एअर इंडियाची फ्लाइट फुल होती. त्यांना रिक्वेस्ट करून, जी किंमत असेल त्याचं तिकिट द्या. एक इकोनॉमी तिकिट ४० हजार रुपये, आणि बिझनेसक्लास तिकिट ७० हजार रुपये. इंडिगोसारखा मार्केट लीडर इतकं अनप्रोफेशनल कसं काय वागू शकतो, प्रवाशांना इतकं गृहीत कस धरलं जात? हे मला कळत नाही.

दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसह देशभरातील विमानतळांवर या सगळ्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. तातडीच्या प्रवासाच्या गरजा असलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.


हे देखील वाचा – Amba Ghat Bus Accident : अंबा घाटात भीषण अपघात; बस १०० फूट खोल दरीत कोसळली; १५ प्रवासी जखमी

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या