Home / देश-विदेश / राजा-सोनम रघुवंशीचा जंगल ट्रेकचा व्हिडिओ व्हायरल

राजा-सोनम रघुवंशीचा जंगल ट्रेकचा व्हिडिओ व्हायरल

इंदूर – राजा रघुवंशी हत्या प्रकरणात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देव सिंग नावाच्या पर्यटकाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर...

By: Team Navakal

इंदूर – राजा रघुवंशी हत्या प्रकरणात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देव सिंग नावाच्या पर्यटकाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनम रघुवंशी जंगल ट्रेकदरम्यान एकत्र दिसत आहेत. सोनम हातात काठी घेऊन पुढे चालताना तर राजा तिच्या मागे पाण्याची बाटली घेत चालताना दिसतो. व्हिडिओमधील दृश्यांवरून हे त्या दोघांचे शेवटचे एकत्र फुटेज असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमुळे प्रकरणात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हिडिओ पोस्ट करताना देव सिंगने लिहिले आहे की, मी २३ मे २०२५ रोजी मेघालयच्या प्रसिद्ध डबल डेकर रूट ब्रिजच्या प्रवासावर गेला होतो आणि त्यावेळी मी व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. मी तो व्हिडीओ पुन्हा पाहत होतो, तेव्हा मला इंदूरचे राजा आणि सोनम माझ्या व्हिडिओत आढळली. सकाळचे साधारणतः ९:४५ वाजलेले होते. आम्ही खाली उतरत होतो आणि राजा-सोनम नोगरीट गावात रात्र घालवून वर चढत होते. माझ्या मते, हे दोघांचे शेवटचे फुटेज असावे. सोनमने तोच पांढरी शर्ट परिधान केली होता जो नंतर राजा रघुवंशीच्या देहाजवळ सापडला. मला आशा आहे की या व्हिडीओमुळे मेघालय पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यात मदत होईल.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या