बंगळुरू- बंगळुरूतील एका खासगी महाविद्यालयात दोन शिक्षकांनी एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या प्राध्यापकांनी पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन प्राध्यापकांसह त्यांच्या एका मित्राला अटक केली आहे. नरेंद्र आणि संदीप अशी दोन्ही शिक्षकांची आणि अनुप असे त्यांच्या मित्राचे नाव आहे.
हे दोघे या खासगी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, सुरुवातीला नरेंद्रने नोट देण्याच्या बहाण्याने माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर आमची मैत्री झाली. नरेंद्रने एके दिवशी मला अनुपच्या खोलीवर मला बोलावले व तिथे त्याने माझ्यावर बलात्कार केला. मला याची कुठेही वाच्यता करण्याची धमकीही दिली. काही दिवसांनंतर संदीपनेही मला त्रास देण्यास सुरुवात केली. मी त्याला विरोध केला असता , त्याने मला नरेंद्रसोबतच्या प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माझ्यावर अत्याचार केला. त्यानंतर अनुपने मला त्याच्या खोलीत येतानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून धमकावले आणि माझा लैंगिक छळ केला. मी याबाबत माझ्या आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर कुटुंबाने कर्नाटक राज्य महिला आयोगाशी संपर्क साधला. तसेच पोलिसांत तक्रार देऊन तिघांना बेड्या ठोकल्या. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत