Home / देश-विदेश / झोमॅटो-स्विगीला टक्कर! रॅपिडो ‘Ownly’ ॲपसह फूड डिलिव्हरीमध्ये करणार एन्ट्री, देणार स्वस्त सेवा

झोमॅटो-स्विगीला टक्कर! रॅपिडो ‘Ownly’ ॲपसह फूड डिलिव्हरीमध्ये करणार एन्ट्री, देणार स्वस्त सेवा

Rapido Food Delivery | बाईक टॅक्सी सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपिडो (Rapido) कंपनीने आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) क्षेत्रात...

By: Team Navakal
Rapido Food Delivery

Rapido Food Delivery | बाईक टॅक्सी सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपिडो (Rapido) कंपनीने आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) क्षेत्रात अधिकृत प्रवेश केला आहे. ‘ओन्ली’ (Ownly) नावाच्या नव्या प्लॅटफॉर्मद्वारे रॅपिडो लवकरच बेंगळुरूमध्ये प्रायोगिक कार्यक्रम सुरू करणार आहे.

या सेवेची सुरुवात जूनअखेरीस किंवा जुलैच्या होण्याची शक्यता असून, झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांसाठी ही मोठी टक्कर ठरू शकते.

रॅपिडोने बाईक टॅक्सी, ऑटो राइड्स आणि लॉजिस्टिक्स सेवा यशस्वीपणे सुरू केल्यानंतर आता आपल्या सेवेचा पोर्टफोलिओ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ओन्ली’ ही सेवा ग्राहकांसाठी पारदर्शक आणि रेस्टॉरंट पार्टनर्ससाठी परवडणारी ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.

या प्लॅटफॉर्मचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शून्य कमिशन धोरण. झोमॅटो आणि स्विगी प्रत्येक ऑर्डरवर 20-30% पर्यंत कमिशन घेतात, मात्र रॅपिडो कोणताही कमिशन, प्लॅटफॉर्म फी किंवा पॅकेजिंग शुल्क आकारणार नाही. याऐवजी, निश्चित डिलिव्हरी शुल्क मॉडेल लागू केला जाईल.

डिलिव्हरी फी (GST वगळता) असा असेल:

  • ₹100 पेक्षा कमी ऑर्डरसाठी: ग्राहक ₹20 आणि रेस्टॉरंट ₹10
  • ₹100 पेक्षा जास्त ऑर्डरसाठी: ₹25 निश्चित डिलिव्हरी शुल्क

या अ‍ॅपमध्ये रेस्टॉरंट्सना स्वतःचा डिलिव्हरी फ्लीट वापरण्याची गरज भासत नाही, त्यामुळे इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत अधिक लवचिकता मिळते.

भारतासारख्या किमतीबाबत संवेदनशील बाजारात रॅपिडोने ‘पारदर्शक दर’ हे आपले प्रमुख वैशिष्ट्य ठेवले आहे. ग्राहकांना अंतिम किंमत डिशजवळच दाखवली जाईल, कोणताही लपवलेला प्लॅटफॉर्म चार्ज किंवा वाढीव दर नसतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

रॅपिडोने एका निवेदनात म्हटले, “बेंगळुरूमध्ये आमचा पायलट प्रोग्रॅम सुरू करत आहोत. आमच्या मजबूत कॅप्टन नेटवर्कचा वापर करून सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी बनवण्याचा प्रयत्न आहे. हा आमच्यासाठी प्रयोग आणि सुधारणा करण्याचा टप्पा आहे.”

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या