Home / देश-विदेश / ‘कुठे छोटा समोसा तर कुठे मोठा…’, भाजप खासदार रवी किशन यांचा लोकसभेत खाद्यपदार्थांच्या दरांवर प्रश्न, व्हिडिओ व्हायरल

‘कुठे छोटा समोसा तर कुठे मोठा…’, भाजप खासदार रवी किशन यांचा लोकसभेत खाद्यपदार्थांच्या दरांवर प्रश्न, व्हिडिओ व्हायरल

Ravi Kishan Lok Sabha Viral Video: गोरखपूरचे भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांनी संसदेत एक वेगळा पण...

By: Team Navakal
Ravi Kishan Lok Sabha Viral Video

Ravi Kishan Lok Sabha Viral Video: गोरखपूरचे भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांनी संसदेत एक वेगळा पण महत्त्वाचा विषय मांडला, ज्यामुळे त्यांचे वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. बुधवारी शून्य प्रहरात त्यांनी देशभरातील खाद्यपदार्थांच्या किमती आणि गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले. (Ravi Kishan Lok Sabha Viral Video)

मात्र, यावेळी बोलताना त्यांनी समोशाचे उदाहरण दिल्याने त्यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. समोशाचे उदाहरण देत त्यांनी पदार्थांच्या किंमती आणि आकारातील असमानतेचा मुद्दा उपस्थित केला.

कायदा करण्याची मागणी

रवी किशन यांनी पंतप्रधान मोदींनी ढाब्यांपासून पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत खाद्यपदार्थांच्या किमती, गुणवत्ता आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची विनंती केली. ते म्हणाले, “एकाच किमतीत काही ठिकाणी ढाब्यात तुम्हाला समोसा X दराने मिळतो, तर Y दराने. काही ठिकाणी छोटा समोसा मिळतो, तर काही ठिकाणी मोठा समो मिळतो.करोडो ग्राहक असलेल्या बाजारात नियम नाहीत का?”

देशातील खाद्यपदार्थांच्या किमती आणि प्रमाणात एकसमानता नसल्याचे सांगत ते म्हणाले, “डाळ तडका काही ठिकाणी 100 रुपयांना मिळतो, कुठे 120 रुपयांना, तर काही हॉटेल्समध्ये तो 1,000 रुपयांना मिळतो.”

खाद्यपदार्थांच्या असमान किंमतीबाबत अशाप्रकारे समोश्याचे उदाहरण दिल्याने रवी किशन यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या