Home / देश-विदेश / Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील बळींच्या कुटुंबियांना आरसीबीकडून २५ लाखांची मदत

Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील बळींच्या कुटुंबियांना आरसीबीकडून २५ लाखांची मदत

Bengaluru Stampede

Bengaluru Stampede: बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम (Chinnaswamy Stadium)वर ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत बळी गेलेल्या नातेवाईकांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या वतीने प्रत्येक २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन प्रिमियर लिग (IPL) – २०२५ स्पर्धा आरसीबीने जिंकल्यानिमित्त ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर जंगी विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लाखो चाहत्यांनी स्टेडियमजवळ गर्दी केली होती.या दरम्यान आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना (Cricketer) जवळून पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेला.विजयोत्सवाच्या आयोजनात आरसीबी संघ व्यवस्थापनाचा सहभाग होता. त्यामुळे या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आज एका निवेदनाद्वारे बळींच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत जाहीर केली.

४ जूनच्या दुदैवी घटनेत ज्यांचा बळी गेला ते आरसीबी कुटुंबाचे सदस्य होते असे आम्ही मानतो.ते आमच्यातील घटक होते.ज्यांच्यामुळेच या शहराचे , आमच्या क्रिडा समुदायाचे आणि आरसीबी संघाचे वेगळेपण अधोरेखित होते.त्यामुळे आम्ही या बळींच्या कुटुंबियांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर त्यांच्या उर्वरित आयुष्यात सदैव साथ देण्यास वचनबध्द आहोत,असे भावनीक निवेदन आरसीबीने केले आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

शिंदेंकडून फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलकांना मदत ! खा. संजय राऊतांची टीका

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मंडल यात्रा तात्पुरती स्थगित

कोस्टल रोड सुशोभिकरणासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची निवड