Home / देश-विदेश / Reliance : रिलायन्स अमेरिकेत 300 अब्ज डॉलरची रिफायनरी उभारणार

Reliance : रिलायन्स अमेरिकेत 300 अब्ज डॉलरची रिफायनरी उभारणार

Reliance : मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात मोठी खासगी तेलशुद्धीकरण कंपनी अशी ओळख असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 
Reliance : मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात मोठी खासगी तेलशुद्धीकरण कंपनी अशी ओळख असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीसोबत अमेरिकेने ऐतिहासिक करार केला आहे. रिलायन्स अमेरिकेत मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरी) उभारणार असून, या प्रकल्पामध्ये सुमारे 300 अब्ज डॉलर (सुमारे 25.35 लाख कोटी रुपये) एवढी अवाढव्य गुंतवणूक करणार आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज यासंबंधी माहिती दिली.एवढी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल ट्रम्प यांनी रिलायन्स कंपनी आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत.


ट्रम्प यांनी रिलायन्ससोबत झालेला हा करार ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत मागील 50 वर्षांच्या कालावधीत उभारला जाणारा हा पहिला नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. अमेरिका फर्स्ट या आपल्या धोरणाचा हा विजय आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.टक्सासमधील ब्राउन्सव्हिले बंदरावर उभारल्या जाणार्‍या या प्रकल्पामुळे अमेरिकेच्या देशांतर्गत बाजाराच्या गरजा पूर्ण करण्याबरोबर तेलाच्या निर्यातीला चालना मिळेल. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा मजबूत  होईल आणि दक्षिण टेक्सासमध्ये हजारो नवीन रोजगार निर्माण होतील, असेही ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


अमेरिका आणि इस्रायलने इराणविरूद्ध छेडलेल्या युध्दामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणने होर्मुज जलमार्ग बंद केल्यामुळे जगातील 20 टक्के तेल पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आपली देशांतर्गत तेल उत्पादन क्षमता वाढवून इतर देशांवरील अवलंबित्व करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने रिलायन्ससोबत हा करार केला आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या