Home / देश-विदेश / युद्ध सुरू असतानाच झेलेन्स्की थेट शत्रूच्या देशात जाणार? शांतता चर्चेसाठी पुतीन यांचा रशियाला येण्याचा प्रस्ताव

युद्ध सुरू असतानाच झेलेन्स्की थेट शत्रूच्या देशात जाणार? शांतता चर्चेसाठी पुतीन यांचा रशियाला येण्याचा प्रस्ताव

Russia Ukraine War

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धा सध्या निर्णायक वळणावर पोहोचले आहे. दोन्ही देशातील युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्यासाठी अमेरिकेकडून मध्यस्थी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी याबाबत चर्चा केली आहे.

रिपोर्टनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्यासोबत शांतता चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे चर्चासत्र रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) येथे घेण्याची पुतीन यांची तयारी आहे. पुतीन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात हा प्रस्ताव दिला.

ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि युरोपातील काही नेत्यांशी वॉशिंग्टनमध्ये चर्चा केली, त्याच वेळी हा फोन कॉल झाला. पुतीन यांनी चर्चेसाठी ‘मॉस्को’चा उल्लेख केला, परंतु झेलेन्स्की यांनी तो प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावला. तसेच, युरोपियन नेत्यांनीही ट्रम्प यांना हा प्रस्ताव योग्य नसल्याचा सल्ला दिला.

नुकतेच अमेरिकेत झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी म्हटले की, चार वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबवण्यासाठी आता पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात थेट चर्चा होणे आवश्यक आहे. गेल्या काही आठवड्यांपासून झेलेन्स्की यांनीही पुतीन यांच्यासोबत थेट चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

क्रेमलिनचे अधिकारी युरी उशाकोव्हयांनी सांगितले की, पुतीन चर्चेसाठी तयार आहेत. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (यांनी स्पष्ट केले की, अशी बैठक घेण्यापूर्वी काळजीपूर्वक तयारी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी अलास्कामध्ये पुतीन यांची भेट घेतली होती. मात्र, त्या भेटीतून शांततेसाठी कोणतीही ठोस घोषणा झाली नव्हती. तर दुसरीकडे स्वित्झर्लंडने शांतता चर्चेसाठी पुतीन यांना त्यांच्या देशात आल्यास त्यांना अटक वॉरंटमधून सूट देण्याची ऑफर दिली होती.

हे देखील वाचा –

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अलर्ट जारी

अतिवृष्टीमुळे मुंबई दुसऱ्या दिवशीही थबकली! आजही मुसळधार पावसाची टांगती तलवार