Russian Cancer Vaccine: रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीच्या (FMBA) शास्त्रज्ञांनी कर्करोगावरील एक नवीन लस (cancer vaccine) विकसित केली आहे. ही लस आता क्लिनिकल वापरासाठी तयार आहे. FMBA चे प्रमुख वेरोनिका स्क्वॉर्टसोवा यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये ही घोषणा केली.
ही लस यशस्वी ठरलवल्यास कर्करोगाच्या (Russian Cancer Vaccine) रुग्णांसाठी आशेचा किरण असेल.
‘एंटेरोमिक्स’ (Enteromix) नावाची ही लस mRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे काही कोविड-19 लसींमध्ये देखील वापरले गेले आहे. कमकुवत विषाणू वापरण्याऐवजी, mRNA लस शरीरातील पेशींना असे प्रोटीन तयार करायला शिकवते, जे कर्करोगाच्या पेशींविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात.
लस कशी काम करते आणि तिचे परिणाम काय?
स्क्वॉर्टसोवा यांनी सांगितले की, या लसीवर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू होते, ज्यात 3 वर्षांच्या आवश्यक प्रीक्लिनिकल चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्यांमध्ये ही लस वारंवार दिल्यावरही सुरक्षित असल्याचे आणि अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
काही प्रकरणांमध्ये, कर्करोगाच्या प्रकारानुसार, गाठी 60 ते 80% पर्यंत आकसल्या किंवा त्यांची वाढ मंदावली. संशोधकांनी चाचण्यांमध्ये सहभागी लोकांमध्ये जगण्याचा दर सुधारल्याचेही नोंदवले. या
लसीचा पहिला उपयोग मोठ्या आतड्याच्या कर्करोगासाठी (colorectal cancer) केला जाईल. तसेच, मेंदूचा वेगवान वाढणारा कर्करोग (glioblastoma) आणि त्वचेच्या काही प्रकारच्या कर्करोगासाठी (melanoma) देखील लसीवर काम सुरू आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
ओबीसींच्या विरोधात जरांगेंच्या समर्थकाचा कोर्टात कॅव्हेट दाखल