Home / देश-विदेश / Sabarimala gold theft case: शबरीमला चोरीचे सोने बंगळुरू येथून जप्त

Sabarimala gold theft case: शबरीमला चोरीचे सोने बंगळुरू येथून जप्त

Sabarimala gold theft case: शबरीमला मंदिरातील सुवर्ण चोरी प्रकरणात विशेष तपास पथकाला (SIT) मोठे यश मिळाले आहे. एसआयटीने या प्रकरणातील...

By: Team Navakal
Sabarimala gold theft case

Sabarimala gold theft case: शबरीमला मंदिरातील सुवर्ण चोरी प्रकरणात विशेष तपास पथकाला (SIT) मोठे यश मिळाले आहे. एसआयटीने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या उन्नीकृष्णन पोट्टी याच्या बंगळुरू येथील घरातून चोरी झालेले १७६ ग्रॅम सोने (gold theft) जप्त केले आहे. पोट्टीचा सहकारी गोवर्धन याच्या बेल्लारी येथील रोड्डम ज्वेलर्सच्या व्यवसायाच्या ठिकाणाहूनही चोरीचे हे सोने हस्तगत करण्यात आले.

एसआयटीने जप्त केलेले सोने हे चोरीच्या मोठ्या साठ्याचा एक भाग असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, चोरी केलेले सोने दागिन्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले असावे, असे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सोन्याची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिक चाचण्या सुरू केल्या आहेत. हे धातू मंदिरातील चोरी गेलेल्या धातूंशी जुळतात की नाही, याची खात्री या या प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.

सुरुवातीला हा किरकोळ चोरीचा प्रकार वाटत होता, परंतु एसआयटीने खोलात जाऊन तपास केल्यानंतर या चोरीमध्ये प्रचंड गुंतागुंत असून त्यासाठी मोठे नियोजन करण्यात आले आहे आणि अनेक व्यक्तींचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये अनेक जणांना अटक होऊ शकते. यापूर्वीच पोट्टी आणि गोवर्धन या दोघांनाही एसआयटीने अटक केली आहे. आतापर्यंतच्या तपासातून जप्त केलेल्या सोन्याचे दागिने बनवून ते खुल्या बाजारात विकले जात होते. या चोरीतील इतर गुन्हेगार आणि त्यांचे जाळे शोधण्याचे काम आता तपास पथक करत आहे.


हे देखील वाचा – 

१०० कोटींचा हिरा नाही, तो तर एक साधा दगडच! पन्नाच्या दगडाची तपासणी

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी केली शिफारस

 मुंबई मेट्रो ३ मार्गावर सामानाची ने-आण करताना प्रवाशांची दमछाक

Web Title:
संबंधित बातम्या