Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्या घटस्फोटानं (Samantha Naga Chaitanya Divorce) त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. चाहत्यांचं लाडकं जोडपं वेगळं झाल्यानं अनेकांनी निराशा व्यक्त केली. त्यातच घटस्फोटानंतर काही वर्षांत नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधल्यामुळे त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच, समंथाबद्दल चाहत्यांनी काळजी व्यक्त केलेली. पण, अशातच आता घटस्फोटाच्या चार वर्षांनी साऊथ सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिनं ‘द फॅमिली मॅन’चे (The Family Man) दिग्दर्शक राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्याशी लग्न केलं आहे. एका खासगी समारंभात दोघांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.
एका खासगी सोहळ्यात समंथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी लग्न केल्याचे फोटो देखील सोसिअल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, समंथाने आपल्या सोशल मीडियावर यासंदर्भातील फोटो पोस्ट करत चाहत्याना सुखद धक्का दिला आहे.
दोघांचं लग्न एका छोटेखानी समारंभात अत्यंत खासगीत झालं. ईशा योगा सेंटरच्या लिंग भैरवी मंदिरात दोघांनी लग्नगाठ बांधली असल्याची चर्चा आहे. लग्नात फक्त ३० पाहुणे उपस्थित होते. समंथानं लग्नासाठी लाल रंगाची साडी परिधान केली होती.
समांथा रूथ प्रभूचं पहिलं लग्न साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यशी तिचा प्रेमविवाह झाला होता. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नागा चैतन्य यानं पुन्हा लग्न केलंय.
नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर, समंथा आणि राज यांनी ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यानंतर दोघांमधील जवळीक अधिक वाढली आणि दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले अश्या चर्चा आहेत.









