Home / देश-विदेश / Sangli Sharya Patil Ends Life : दिल्लीत दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या; शेवटचं तुमचं मन तोडतोय अशी सुसाईड नोट लिहीत आई वडिलांना दिला निरोप

Sangli Sharya Patil Ends Life : दिल्लीत दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या; शेवटचं तुमचं मन तोडतोय अशी सुसाईड नोट लिहीत आई वडिलांना दिला निरोप

Sangli Sharya Patil Ends Life : दिल्लीत आजवर अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. आता अजून एका घटनेने दिल्ली...

By: Team Navakal
Sangli Sharya Patil Ends Life
Social + WhatsApp CTA

Sangli Sharya Patil Ends Life : दिल्लीत आजवर अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. आता अजून एका घटनेने दिल्ली हादरलं आहे. दिल्लीतील (Delhi) सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून एका दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली आहे. शौर्य प्रदीप पाटील (Shaurya Patil), असे या पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नवी दिल्लीतील राजीवनगर या भागात राहत होता. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली (Sangli) जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा राहणारा. त्याचे वडील प्रदीप पाटील हे एका व्यवसायानिम्मित गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीव नगर भागात राहण्यास होता.

अधिकच्या माहितीनुसार, शौर्य प्रदीप पाटील हा अवघ्या १६ वर्षाचा मुलगा होता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस या शाळेचा विद्यार्थी होता. त्याने शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दिल्लीच्या राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून उडी घेत आत्मत्या केली. आत्महत्येनंतर त्याला तातडीने लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी या संधर्भात माध्यमांना अधिक माहिती सांगितली आहे ते म्हणाले की, ही घटना मंगळवारी घडली. माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं आणि आई आयसीयूमध्ये असल्याने मी कोल्हापूरला आलो होतो. सकाळी सात वाजता माझ्या मुलाला ड्रायव्हर शाळेत सोडून आला होता. त्यानंतर ड्रायव्हर मुलाची पावणे दोन वाजता वाट बघत थांबला होता. मात्र, बराच काळ शौर्य आला नसल्याने ड्रायव्हरने घरी फोन केला की शौर्य अजून आलेला नाही. त्याच्या एका मित्राने त्याला गाडीत बसवण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु त्याने मेट्रोची वाट पकडली. त्याच्या मित्राने माझ्या बायकोला फोन करून सांगितले की, तो मेट्रोकडे गेलेला आहे. मला यासंदर्भात पावणे तीन वाजता फोन आला. तुम्ही शौर्य पाटीलचे नातेवाईक बोलत आहात का? तो पुलावरून खाली पडला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. सुरुवातीला आम्हाला वाटले की हाअपघात आहे. पण जेव्हा पोलिसांशी बोलणे झाले तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यांनी आम्हाला सांगितले की, त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली आहे. तेव्हा आम्हाला समजले की, त्याने आत्महत्या केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रदीप पाटील पुढे सांगतात की, गेल्या सात-आठ महिन्यापासून तो सतत सांगत होता की, तिथले शिक्षक मला खूप त्रास देतात. मी तिथे पॅरेंट्स टीचर मिटिंगलासुद्धा गेलो होतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना शिक्षक सांगतात की, तुमचा मुलगा खूप खोडकर आहे. पण त्या अतिशय साधारण गोष्टी आहेत. पण, त्यानंतर देखील काही विद्यार्थ्यांना शिक्षक त्रास देतच होते. चार दिवसांपूर्वी एका शिक्षकाने त्याला सांगितले की, तुला आम्ही टीसी देऊ, तेव्हापासून तो प्रचंड निराश असावा. यानंतर आत्महत्येच्या दिवशी एका कार्यक्रमात तो अचानक पाय घसरून पडला. त्यावेळी शिक्षकांनी त्याच्यावर आरोप लावला की, तू पाय घसरून पडला नाही तर तू मुद्दाम पडलास. तेव्हा तो प्रचंड रडत होता. पण शिक्षकांनी त्याला म्हटले की, तुझा ड्रामा बंद कर. आणि मुख्याध्यापिका देखील तिथेच होत्या. पण त्यांनी देखील यावर काहीच आक्षेप घेतला नाही. घटनेच्या दिवशीच शिक्षकांनी शौर्यचा सर्वांसमोर अपमान केला. असे देखील त्यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांना शौर्य पाटीलच्या स्कूल बॅगमध्ये दीड पानाची एक सुसाइड नोट सापडली. या नोटमध्ये त्याने शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून हे मोठे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. ही सुसाइड नोट त्याने हिंदीत लिहिली आहे. शौर्यने त्यात लिहले आहे कि, माझं नाव शौर्य पाटील आहे. मी जे केलं आहे त्यासाठी मी तुमची माफी मागतो. पण शाळेतील शिक्षकांनी इतका त्रास दिला कि मला हे पाउल उचलावं लागलं. जर कोणाला गरज असेल तर माझे अवयव दान करावेत. माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. मी तुम्हाला काहीच नाही देऊ शकलो. त्यासाठी सॉरी मम्मी. मी शेवटच एकदा तुमचं मन तोडतोय. कारण या शाळेतील शिक्षकच असे आहेत काय सांगू.. एवढ्याश्या वयात या मुलात इतका समजुदारपणा होता. त्याच हे पत्र मनाला प्रचंड यातना देणार आहे.

दिल्लीच्या राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी ही सुसाइड नोट हाती लागल्यानंतर त्या आधारावर शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या ४ शिक्षिकांविोरधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर जगभरातुन रोष व्यक्त केला जात आहे.


हे देखील वाचा –

Nashik Malegaon Crime News : मालेगावातील मन पिळवटून टाकणारी घटना..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या