रियाद – हज (Hajj) यात्रेनिमित्त सौदी सरकारने ‘ब्लॉक वर्क व्हिसा कोटा’(Block Work Visa Quota)वर लावलेली तात्पुरती बंदी हटवली. याचा फायदा भारतासह १४ देशांतील (from 14 countries) कामगारांना होणार आहे. याबाबत सौदी सरकारच्या (Saudi government) मानव संसाधन व सामाजिक विकास मंत्रालयाने (Ministry of Human Resources and)घोषणा केली.
भारत,पाकिस्तान,बांगलादेश, सुदान, इजिप्त, इथिओपिया, इराक,इंडोनेशिया,अल्जेरिया, जॉर्डन,मोरोक्को,ट्युनिशिया,नायजेरिया आणि येमेन या १४ देशांच्या नागरिकांसाठी ‘ब्लॉक वर्क व्हिसा’वर लादलेली तात्पुरती बंदी सौदी अरेबियाने हटवली.यावर्षीच्या सुरुवातीस सौदी सरकारने हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही तात्पुरती बंदी लागू केली होती.दरवर्षी हजच्या काळात सौदीमध्ये लाखो भाविकांची गर्दी होते.परंतु मागील काही वर्षांतील अनुभवांनुसार इतर प्रकारच्या व्हिसावर आलेले लोकही हजसाठी प्रयत्न करत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. सौदी अरेबियामध्ये भारतीय कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार भारतीय समुदायाची संख्या २६ लाखांहून अधिक झाली आहे आणि ती दरवर्षी १० टक्क्यांनी वाढते.
