Banke Bihari Mandir -वृंदावनमधील सुप्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील (Banke Bihari Mandir)सुमारे १६० वर्षे जुना आणि मौल्यवान खजिना तब्बल ५४ वर्षांनंतर धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आला. गर्भगृहाजवळ असलेला हा विशेष तोशखाना (कोषागार) शेवटचा १९७१ मध्ये उघडण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांसह चार नामनिर्देशित गोस्वामींच्या उपस्थितीत हे विशेष कपाट उघडण्यात आले. खजिना उघडण्यापूर्वी मंदिराचे सेवायत दिनेश गोस्वामी यांनी गर्भगृहाजवळील कोषागारासमोर दिवा लावून पूजा केली. त्यानंतर लोखंडी दरवाज्याचे कुलूप ग्राइंडरने कापण्यात आले. सुमारे ४५ मिनिटे साफसफाई केल्यानंतर पहिल्या खोलीत सोने–चांदीच्या नाण्यांनी भरलेला एक मोठा कलश सापडला.
गर्भगृहाजवळील हा दरवाजा उघडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेल्या समितीने १७ ऑक्टोबर रोजी खजिना उघडण्याचे निर्देश दिले. समितीत सिव्हिल जज, ऑडिटर आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. यापूर्वी १९७१ मध्ये हा खजिना उघडण्यात आला होता. तेव्हा सोन्याचे कलश, चांदीचा शेषनाग आणि नवरत्नांनी सजलेली दागिने मिळाल्याचे सांगितले जाते. आता पुन्हा एकदा उघडण्यात आलेल्या या खजिन्यात नेमके काय मिळाले, याबाबत अधिकृत माहिती समिती लवकरच जाहीर करणार आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा–
कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे देहू येथे लाक्षणिक उपोषण
उबाठाचा २५ ऑक्टोबरला मतदार यादीबाबत मेळावा
ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाला गती सर्व परवानग्या मंजूर !अडथळे दूर