Home / देश-विदेश / जगभरात भारतीय वंशाच्या नागरिकांचा डंका! P&G च्या CEO पदी शैलेश जेजुरीकर यांची निवड

जगभरात भारतीय वंशाच्या नागरिकांचा डंका! P&G च्या CEO पदी शैलेश जेजुरीकर यांची निवड

Shailesh Jejurikar Appointed As P&G CEO: जगभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाचे नागरिक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता...

By: Team Navakal
Shailesh Jejurikar Appointed As P&G CEO

Shailesh Jejurikar Appointed As P&G CEO: जगभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाचे नागरिक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अमेरिकेची प्रसिद्ध एफएमसीजीकंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल (Procter & Gamble) ने मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा एका भारतीयांकडे सोपवली जाणार आहे. P&G ने शैलेश जेजुरीकर (Shailesh Jejurikar) यांची कंपनीचे सीईओ (P&G CEO) म्हणून निवड केली आहे.

कंपनीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन मोएलर यांनी पद सोडल्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून शैलेश जेजुरीकर यांची अधिकृतपणे सीईओ म्हणून नियुक्ती होणार आहे. (Shailesh Jejurikar Appointed As P&G CEO)

P&G मध्ये 1989 पासून कारकीर्द

जेजुरीकर यांचे वय सध्या 58 वर्षे असून त्यांनी 1989 मध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये सहाय्यक ब्रँड मॅनेजर म्हणून काम सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी कंपनीत अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आणि सध्या ते मुख्य ऑपरेटिंग अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या वार्षिक भागधारक बैठकीत त्यांचे संचालक म्हणून नामांकनही जाहीर करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढवण्यात मोलाचे योगदान

आपल्या दीर्घ कारकिर्दीत जेजुरीकर यांनी कंपनीच्या फॅब्रिक आणि होम केअर विभागांबरोबरच उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि लॅटिन अमेरिका या बाजारांमध्ये महत्त्वपूर्ण नेतृत्व दिले. तसेच पुरवठा साखळी, माहिती तंत्रज्ञान आणि जागतिक व्यवसाय सेवा विभागात बदल घडवत कंपनीसाठी परिणामकारक कार्यपद्धती विकसित केल्या.

आयआयएम लखनौचे (IIM Lucknow) माजी विद्यार्थी असलेले जेजुरीकर, जागतिक कंपन्यांमधील भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांच्या लीगमध्ये सामील होणारे नवीन नाव आहेत. याआधी याच महिन्यात मोरादाबादमध्ये जन्मलेले सबीह खान यांची ॲपलच्या कार्यकारी प्रमुख पदावर बढती झाली होती.

भारतातील बळकट उपस्थिती

अॅरिअल, टाईड, जिलेट, पॅम्पर्स, हेड अँड शोल्डर्स, विक्स, व्हिस्पर, ओले आणि ओरल-बी यांसारख्या नावाजलेल्या ब्रँड्सद्वारे पी अँड जी भारतात आपली बाजारपेठ सतत मजबूत करत आहे. शैलेश जेजुरीकर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा जागतिक विस्तार आणि नवनवीन धोरणांद्वारे वाढीचा प्रवास अधिक गतीमान होण्याची शक्यता आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या